आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘गंगा खोटे बोलत नाही...’:‘भास्कर’च्या धारदार पत्रकारितेचा वृत्तांत ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये प्रसिद्ध

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘गंगा खोटे बोलत नाही...’ या शीर्षकाने ‘भास्कर’चे ओम गौड यांचा वृत्तांत अमेरिकेच्या आघाडीच्या वृत्तपत्रात प्रकाशित

कोरोनाच्या आव्हानात्मक काळात देशातील विविध राज्यांच्या वास्तविक स्थितीवर ‘दैनिक भास्कर’च्या शोधपत्रकारितेची आणि धाडसी पत्रकारितेची जागतिक स्तरावर प्रशंसा होत आहे. अनेक अव्वल आंतरराष्ट्रीय माध्यम संस्थांनी भारतातील कोरोनाच्या स्थितीच्या वृत्तांकनात ‘भास्कर’च्या विश्वासार्ह बातम्यांचा उल्लेख केला आहे. आता अमेरिकेच्या ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ या सर्वात विश्वासार्ह आणि प्रतिष्ठित वृत्तपत्रानेही ‘दैनिक भास्कर’ला एक विशिष्ट स्थान दिले आहे. १७० वर्षांची परंपरा असलेल्या ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने याबाबत एक सविस्तर वृत्तांत प्रकाशित केला आहे. ‘गंगा खोटे बोलत नाही, ती मृतदेह परत देत आहे,’ या शीर्षकाने ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये ‘दैनिक भास्कर’चे नॅशनल एडिटर ओम गौड यांनी दिलेला संपूर्ण वृत्तांत प्रकाशित झाला आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये गौड यांनी उत्तर प्रदेशपासून बिहारपर्यंत महामारीच्या दुसऱ्या लाटेदरम्यानची वस्तुस्थिती मांडली आहे. ‘भास्कर’ने ३० बातमीदार आणि छायाचित्रकारांचा चमू उतरवल्यानंतर गंगा नदी आणि तिच्या किनाऱ्यावर मृतदेहांची रांग कशी दिसली हे वास्तव ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये प्रकाशित वृत्तात मांडण्यात आले आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने एखाद्या हिंदी वृत्तपत्राला बहुधा प्रथमच अशा प्रकारे विशेष स्थान दिले आहे.

‘भास्कर’ला विशेष वृत्तांत लिहिण्याचा आग्रह केला होता...
जगातील सर्वात शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या चमूने या वृत्तांतासाठी ‘दैनिक भास्कर’ला आमंत्रित करून कोरोनाच्या वास्तव स्थितीबाबतचा विशेष वृत्तांत लिहिण्याचा आग्रह केला होता. ‘दैनिक भास्कर’चे वास्तववादी आणि दमदार वृत्तांकन प्रकाशित करून ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने ‘भास्कर’च्या विश्वासार्हतेला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. ‘दैनिक भास्कर समूहा’साठी हा गौरवाचा क्षण आहे. विशेष म्हणजे ‘न्यूयॉर्क टाइम्स’ हे जगातील एकमेव वृत्तपत्र आहे, ज्याला आपल्या विश्वासार्ह, शोधपत्रकारिता आणि तथ्यात्मक पत्रकारितेसाठी सर्वाधिक १३३ पुलित्झर पुरस्कार मिळाले आहेत. पुलित्झरला पत्रकारितेचे ‘नोबेल’ म्हटले जाते.

बातम्या आणखी आहेत...