आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारी नोकरी:भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये 575 शिकाऊ पदांसाठी भरती, उमेदवार 7 सप्टेंबरपर्यंत करु शकतात अर्ज

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, शिकाऊ उमेदवाराच्या एकूण 575 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. ज्या उमेदवारांना या रिक्त पदासाठी अर्ज करायचा आहे ते BHEL च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. फिटर, वेल्डर आणि इलेक्ट्रिशियन या पदांसाठी भरती होणार आहे.

BHEL ने जाहीर केलेल्या या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया 24 ऑगस्ट 2022 पासून सुरू झाली आहे. यामध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 07 सप्टेंबर 2022 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

पात्रता
या पदांसाठी 10वी, 12वी उत्तीर्ण आणि पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. ज्या उमेदवारांकडे B.Com, BA, B.Sc नर्सिंग आणि B Pharma पदवी आहे, ते उमेदवार ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदांसाठी अर्ज करू शकतील.

वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे. यामध्ये फक्त तेच उमेदवार अर्ज करू शकतात, ज्यांचे वय 27 वर्षांपेक्षा कमी आहे. आरक्षणाच्या कक्षेत येणाऱ्या उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

निवड प्रक्रिया
उमेदवारांची गुणवत्ता यादी आणि कागदपत्र पडताळणीच्या आधारे निवड केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना 7,700 रुपये ते 9,000 रुपये प्रति महिना स्टायपेंड दिला जाईल.

असा करा अर्ज

  • अधिकृत वेबसाइट- trichy.bhel.com वर क्लिक करा.
  • होम पेजवर Bharat Heavy Electricals Limited,Tiruchirappalli या लिंकवर क्लिक करा.
  • यानंतर Graduate Apprentice च्या लिंकवर जा.
  • आता Apply Online या पर्यायावर क्लिक करा.
  • उमेदवारांनी प्रथम तपशील भरून नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • नोंदणी केल्यानंतर तुम्ही अर्ज भरू शकता.

ऑफिशिअल नोटिफिकेशन

बातम्या आणखी आहेत...