आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Bhima Koregaon Case : NIA Files Chargesheet Against Eight Persons Including Anand Teltumbde, Gautam Navlakha

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भीमा कोरेगाव प्रकरण:एनआयएकडून आनंद तेलतुंबडे, गौतम नवलाखा यांच्यासह आठ जणांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराच्या कटात सामील असल्याच्या आरोपाखाली सामाजिक कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी यांना गुरुवारी अटक करण्यात आली.

भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराच्या कटात सामील असल्याच्या आरोपाखाली सामाजिक कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी यांना गुरुवारी अटक करण्यात आली आहे. यानंतर आता भीमा कोरेगाव प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने म्हणजेच एनआयएने 8 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये आनंद तेलतुंबडे, गौतम नवलाखा यांच्यासह आठ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.

एएनआयने या संदर्भात वृत्त दिले आहे. यामध्ये आनंद तेलतुंबडे, गौतम नवलाखा, हॅनी बाबू, सागर गोरखे, रमेश गैचोर, ज्योती जगताप, स्टॅन स्वामी आणि मिलिंद तेलतुंबडे यांच्या विरोधात चार्जशीट दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.1 जानेवारी 2018 रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव मध्ये हिंसाचार झाला होता. याच्या एक दिवसपूर्वी पुण्यातल्या शनिवार वाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनात या हिंसेचे मूळ असल्याचा आरोप पुणे पोलिसांचा आहे.

भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराच्या कटात सामील असल्याच्या आरोपाखाली सामाजिक कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी यांना गुरुवारी अटक करण्यात आली. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) यांना झारखंडमधील नामकुम बगईचा येथील निवासस्थानावरून ताब्यात घेतले. यावर्षी जानेवारीत एनआयएने हे प्रकरण घेतले. ऑगस्टमध्ये प्रथमच फादर स्टॅन स्वामी यांच्यावरही चौकशी केली गेली. स्वत: चे मानवाधिकार कार्यकर्ते म्हणून वर्णन करणाऱ्या फादर स्टॅन स्वामी यांच्यावर आरोप आहे की, त्यांच्या आणि त्यांच्या साथिदारांच्या भाषणानंतरच 1 जानेवारी 2018 मध्ये भीमा कोरेगावमध्ये हिंसाचार उसळला होता.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser