आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी सिंगर समरसिंहला अटक करण्यात आली आहे. वाराणसी पोलिसांनी गाझियाबादच्या नंदग्राम क्षेत्रातून 12 दिवसांनंतर त्याच्या मुसक्या आवळल्या. आकांक्षाच्या आईने समरसिंहवर मुलीची रिलेशनशिपमध्ये फसवणूक केल्याचा आरोप केला होता. आकांक्षाने गत 26 मार्च रोजी येथील एका हॉटेलात आत्महत्या केली होती.
आरोपी गायक समरसिंह व त्याचा भाऊ संजय सिंह यांच्याविरोधात NBW जारी झाली होती. तेव्हापासून त्याच्या मुसक्या आवळण्याचे प्रयत्न सुरू होते. तत्पूर्वी त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीसही जारी झाली होती. पोलिसांना हे दोघे परदेशात पळून जातील असा संशय होता. पोलिसांना संजय अजून सापडला नाही. तो फरार आहे.
वाराणसी पोलिसांनी समरसिंहला गाझियाबादच्या सीजेएम न्यायालयात हजर केले. तिथे त्यांनी त्याच्या ट्रान्झिट रिमांडची मागणी केली. कोर्टाने ती मान्य केली. वाराणसी पोलिस आता त्याला घेऊन वाराणसीच्या दिशेने निघाले आहेत.
4 दिवसांपासून आला होता गाझियाबादला
ADCP वाराणसी मनीष सांडिल्य यांनी सांगितले की, समर सिंहला राजनगर एक्स्टेंशनच्या चार्म्स क्रिस्टल सोसायटीतून अटक करण्यात आली. यापूर्वी तो नोएडात राहत होता. तो 4 दिवसांपूर्वी येथे आला. गाझियाबादचे डीसीपी निपुण अग्रवाल यांच्या माहितीनुसार, वाराणसी पोलिस गुरुवारी येथे आले. त्यांनी आमच्याकडे आकांक्षा दुबे प्रकरणात मदत मागितली होती. त्यानंतर वाराणसी पोलिसांनी त्याला गाझियाबादच्या नंदग्राम पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोराटा गावाजवळील एका सोसायटीतून अटक करण्यात आली.
पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देणे टाळले
DCP निपुण अग्रवाल यांनी सांगितले की, गाझियाबादच्या चार्म्स क्रिस्टल सोसायटीतून एकूण 3 जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यापैकी समर सिंहला अटक करण्यात आली. उर्वरित दोघांना चौकशीनंतर सोडण्यात आले. माध्यमांनी यावेळी समरला त्याच्या आकांक्षी असणाऱ्या संबंधांविषयी प्रश्न विचारले. पण एकही उत्तर दिले नाही. तो पांढऱ्या रुमालाने तोंड लपवत होता. पोलिसांनी समरला नंदग्राम पोलिस ठाण्यातून बाहेर काढले व न्यायालयात नेले.
CJM कोर्टात मधु दुबेंच्या वकिलांची याचिका
गत 26 मार्च रोजी आकांक्षा दुबेचा मृतदेह सारनाथ येथील एका हॉटेलच्या खोलीत गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळला. अभिनेत्रीची आई मधू दुबे यांचे वकील शशांक शेखर त्रिपाठी यांनी मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडे या प्रकरणाच्या तपासावर नजर ठेवण्याची विनंती केली आहे. त्यांच्या याचिकेत आकांक्षा दुबे व समर सिंह यांच्यातील संबंधांची माहिती देण्यात आली होती. आरोपी आकांक्षासोबत 3 वर्षांपासून लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होता.
या कालावधीत त्याने त्यांचे अनेक फोटो व व्हिडिओ रेकॉर्ड केले. तो हे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होता. दुसऱ्या हिरोंसोबत काम केले तर तिला मारहाण करत होता. या याचिकेवर CJM ने पोलिसांकडून अहवाल मागवला आहे.
हायकोर्टात समर व संजय सिंहांच्या वकिलांची याचिका
दुसरीकडे, आरोपी समरस सिंह व संजय सिंह यांनी हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. त्याचे वकील राजेश प्रताप सिंह यांनी हायकोर्टाच्या ऑनलाईन वेबसाईटवर 5 एप्रिल रोजी याचिकेची नोंदणी केली होती. ती 6 एप्रिल रोजी मान्य करण्यात आली. पण या याचिकेवर गुरुवारी कोणत्याही प्रकारची सुनावणी झाली नाही.
न्यायालयाच्या शेड्यूलमध्ये संभाव्य न्यायाधीशांची नावे देण्यात आली आहेत. त्यात वरिष्ठ जज अंजनी कुमार मिश्रा व जज नंद प्रभा शुक्ला यांचे खंडपीठ सुनावणी करेल असा उल्लेख आहे. तूर्त सुनावणीची तारीख निश्चित झाली नाही. समर सिंहच्या वकिलांनी कोर्टापुढे काही पुरावे सादर केल्याचा दावा केला आहे.
वकिलाने सांगितले की, समर सिंहला या प्रकरणात अडकवले जात आहे. त्यांच्याविरोधात चुकीच्या आधारावर FIR दाखल झाला आहे. अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनी निराधार आरोपांसह समरची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे त्याचे करिअर उद्धवस्त होत आहे. कोर्टाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन दिलासा द्यावा.
आकांक्षाने घेतला होता गळफास
आकांक्षा दुबेने 26 मार्च रोजी वाराणसीतील सारनाथ स्थिति एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. हॉटेलच्या रुम क्रमांक 105 मध्ये तिचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला. आकांक्षाच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आकांक्षा भदोही जिल्ह्यातील चौरी पोलिस स्टेशन हद्दीतील पारसीपूर गावची रहिवासी होती. सकाळी मेकअप मॅनने आकांक्षा दुबेला फोन केला.
तिने फोन न उचलल्याने मेकअपमन हॉटेलवर पोहोचला. तिथे आकांक्षाच्या खोलीचा दरवाजा बंद होता. यावेळी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्याला आकांक्षाने सकाळपासून नाश्ता ऑर्डर केला नसल्याचे सांगितले. त्यानंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी खोलीचा दरवाजा ठोठावला. आतून कोणताही प्रतिसाद न आल्याने त्यांनी पोलिसांना पाचारण केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.