आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्रिपुरात भौमिक पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याची शक्यता:माजी CM साहा प्रस्ताव मांडण्याची शक्यता

सुजित ठाकूर | नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय मंत्री प्रतिमा भौमिक त्रिपुराच्या आगामी मुख्यमंत्री होऊ शकतात. राज्यात विधिमंडळ पक्ष बैठकीत नेता निवड प्रक्रियेसाठी केंद्रीय निरीक्षकांना याबाबतची चाचपणी करण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

भौमिक मुख्यमंत्री झाल्यास त्या ईशान्येकडील राज्यांतील पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरतील. होळीपूर्वीच दोन केंद्रीय निरीक्षक त्रिपुराला पाठवले जातील. सकारात्मक चर्चा झाल्यास विधिमंडळ नेते रूपात भौमिक यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी मांडले जाईल. माणिक साहा त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडतील. प्रतिमा मोदी सरकारमध्ये सामाजिक न्याय राज्यमंत्री आहेत. पक्षाने त्यांना धनपूरची उमेदवारी दिली होती. या मतदारसंघातून त्यांचा ३५०० मतांनी विजय झाला होता. माणिक साहा याच मतदारसंघातून पाच वेळा आमदार झाले होते. भाजपशासित राज्यांत एकही महिला मुख्यमंत्री नाही. राजस्थानात अद्याप वसुंधराराजे यांना मुख्यमंत्र्यांचा चेहरा म्हणून अद्याप जाहीर केलेले नाही.

बातम्या आणखी आहेत...