आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Bhumi Pujan Of Temple Construction At Shri Ram Janmabhoomi In Ayodhya Today News And Updates

शुभ घटिका:29 वर्षांनी अयोध्येत जाणार मोदी, रामललाचे दर्शन घेणारे पहिले पंतप्रधान असतील, दुपारी 12.30 वाजता भूमिपूजन करतील; 32 सेंकदचा असेल मुहूर्त

अयोध्याएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • अयोध्येतून दिव्य मराठीच्या वाचकांसाठी विशेष
 • दूरदर्शनवर सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत थेट प्रक्षेपण

आज रामजन्मभूमीचा भूमिपूजन दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येकडे रवाना झाला आहेत. ते रामलालचे दर्शन घेणारे आणि हनुमान गढीला जाणारे पहिले पंतप्रधान असतील. दुपारी 12.30 वाजत मोदी राम मंदिराचे भूमिपूजन करतील. मोदी आणि भाजपने 10 पैकी 8 लोकसभा निवडणुकांत राम मंदिर उभारण्याचे आश्वानस दिले होते. ...आणि सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे भूमिपूजनाचे पहिले आमंत्रण बाबरी मशिदीचे पक्षकार राहिलेले इक्बाल अन्सारी यांना पाठवले होते.

492 वर्षांपूर्वी बाबरच्या आदेशानुसार अयोध्येत वादग्रस्त रचना बांधली गेली. 1885 मध्ये पहिल्यांदा हे प्रकरण न्यायालयात गेले. 2019 मध्ये सुप्रीम कोर्टाने रामललाच्या बाजुने निकाल दिला. याच्या ठीक नऊ महिन्यांनंतर अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन होत आहे.

स्वातंत्र्यानंतर मोदी हे एकमेव पंतप्रधान असतील जे हे पद सांभाळताना रामललाच्या दरबारात असतील. त्यांच्या अगोदर इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी स्वत: पंतप्रधान म्हणून अयोध्येत पोहोचले, पण ते रामललाचे दर्शन घेऊ शकले नाही.

मोदी 29 वर्षांनंतर अयोध्येत

यापूर्वी मोदी 1991 मध्ये अयोध्येत गेले होते. तेव्हा भाजपाचे अध्यक्ष मुरली मनोहर जोशी तिरंगा यात्रा काढत होते आणि त्या यात्रेत मोदी त्यांच्यासोबत होते. मोदींनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी फैजाबाद-आंबेडकर नगरमध्ये एका सभेला संबोधित केले होते मात्र ते अयोध्येत गेले नाहीत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बाबा रामदेव आणि संतांचे पूजेच्या ठिकाणी अभिवादन करताना
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बाबा रामदेव आणि संतांचे पूजेच्या ठिकाणी अभिवादन करताना
माजी केंद्रीय मंत्री उमा भारती कार्यक्रमस्थळी पोहचल्या, यापूर्वी आपण सरयू किनाऱ्यावर थांबणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
माजी केंद्रीय मंत्री उमा भारती कार्यक्रमस्थळी पोहचल्या, यापूर्वी आपण सरयू किनाऱ्यावर थांबणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

अपडेट्स

 • आरएसएस प्रमुख मोहन भागवत कार्यक्रमस्थळी पोहोचले.
 • माजी केंद्रिय मंत्री उमा भारती देखील कार्यक्रमस्थळी पोहोचल्या. त्यांनी ट्विट करून सांगितले की, त्यांना राम जन्मभूमी न्यासाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे निर्देश दिले. याआधी आपण शिलान्यास दरम्यान शरयू किनारी राहणार असल्याचे म्हटले होते.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी वायुसेनेच्या विमानाने लखनौत पोहचले. येथून ते हेलिकॉप्टरने अयोध्येसाठी रवाना झाले.
 • मोदी सर्वात पहिले हनुमानगढी येथे जातील. संपूर्ण मंदिर सॅनिटाईझ करण्यात आले आहे. मंदिराजवळ कडक बंदोबस्त आहे.
 • अयोध्येत पोहोचलेले रामदेव बाबा म्हणाले, आज ऐतिहासिक दिवस आहे. आजचा दिवस दीर्घकाळ आठवणीत ठेवला जाईल. देशात रामराज्याची स्थपणा होईल.
 • हनुमानगढीचे मुख्य पुजारी प्रेमदास महाराज म्हणाले की, आज गर्वाचा क्षण आहे. "आम्ही पंतप्रधान मोदी यांना पगडी आणि रामनामी देऊन सन्मान करणार. त्यांना चांदीचे नाणेही देणार आहोत."

आज अवघे विश्व अयाेध्येत ‘रामकाज’सह नव्या युगाच्या सौहार्दपूर्ण शुभारंभाचे साक्षीदार ठरेल. ५०० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भगवान श्रीरामांच्या जन्मभूमीवर भव्य मंदिराचे बांधकाम सुरू होईल. याआधी, मंगळवारी सकाळी हनुमानाची अर्चना करून भूमिपूजनाची परवानगी मागण्यात आली.

कित्येक पिढ्यांपासून अयोध्येचा आत्मा अस्वस्थेत जगत होता. ही अस्वस्थता आता समाप्त होत आहे. मंगळवारी सूर्यास्त झाला खरा, परंतु सूर्योदयाच्या प्रतीक्षेत अयोध्येची झोपच उडाली आहे. उघड्या डोळ्यात एक उल्हसित स्वप्न आहे. बुधवारची सकाळ ५०० वर्षांनंतर अयोध्येच्या क्षितिजावर नवा प्रकाश घेऊन येईल. रामलल्ला जन्मभूमीवर मंदिर पुनर्बांधणीचे स्वप्न साकार होईल.

भारतासह जगभरातील रामभक्तांचे भव्य राममंदिराचे स्वप्न पूर्ण होण्याची शुभ घटिका दुपारी १२.३९.२० वाजता येईल. ३२ सेकंदांच्या या शुभ मुहूर्तात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नऊ पवित्र शिळांचे पूजन होईल. आपल्या आराध्य दैवताच्या भव्य मंदिराचे स्वप्न साकार होत असल्याच्या भावनेतून अयोध्येत त्रेतायुगासारखा... रघुनंदन जणू रघुकुलात परतल्यासारखा उत्साह आहे. रामलल्ला जणू पाळण्यात आहेत अन् घरोघरी-अंगणांत पुत्रजन्माची मंगलगाणी सुरू आहेत. अयोध्येतील विविध मठ, मंदिरांच्या अंगणात कुठे कौसल्येचा राम, कुठे दशरथाचे नंदन राम, कुठे वाल्मीकींचे राम तर कुठे तुलसीदासांचे राम दिसत आहेत. अवघी नगरी आतुर आहे. उत्सवाचे वातावरण आहे... यासाठी शब्दही अपुरे आहेत... “समुझती बनयी न जाय बखानी’ सर्वत्र हर्ष आहे... अयोध्येत अनेक पिढ्या बेचैनीत जगल्या. श्रीरामांना जणू अनिश्चित काळासाठी वनवास झाल्यासारखी अयोध्या ओस होती. मात्र, ही अस्वस्थता आता संपली आहे. अयोध्येला माहिती आहे, यात आता विघ्न येणारच नाही.’ (शब्दांकन : विजय उपाध्याय)

प्रदीर्घ काळाची प्रतीक्षा सार्थ ठरली : अडवाणी

ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी म्हणाले, ‘राम मंदिर आंदोलनात सुदैवाने मला सोमनाथ ते अयोध्येपर्यंत रथयात्रेची संधी मिळाली, याचा आनंद वाटतो. अनेकदा स्वप्नपूर्तीसाठी खूप प्रतीक्षा करावी लागते. मात्र ते जेव्हा पूर्ण होते तेव्हा ही प्रतीक्षा सार्थ ठरते. राम मंदिर शांततापूर्ण आणि सौहार्दपूर्ण राष्ट्राच्या रूपात भारताचे प्रतिनिधित्व करेल.’

प्रत्येक पाहुण्याला प्रसाद म्हणून चांदीचे नाणे

सोहळ्यासाठी आलेल्या पाहुण्यांना चांदीचे नाणे दिले जाईल. त्याच्या एका बाजूला भगवान राम, सीता, लक्ष्मण व हनुमानासह राम दरबाराचे चित्र, तर दुसऱ्या बाजूला ट्रस्टचे चिन्ह आहे. यात ३६ आध्यात्मिक परंपरांच्या १७५ संतांचा समावेश आहे. विहिंप नेते अशाेक सिंघल यांचे पुतणे सलील हे पूजेचे मुख्य यजमान असतील

पंतप्रधानपदानंतर मोदी-भागवत प्रथमच एका व्यासपीठावर; आधी सरसंघचालकांचे भाषण होईल

> सकाळी 11:30 वा. पंतप्रधानांचे आगमन

> 11:40 वा. हनुमानगढीमध्ये येऊन १० मिनिटे दर्शन आणि पूजन करतील.

> 12:00 वा. राम जन्मभूमीत आगमन. १० मिनिट रामलल्लांचे दर्शन-पूजन.

> 12:30 वा. भूमिपूजन सोहळा.

> 12.39.20 वा ३२ सेकंदांच्या शुभ मुहूर्तावर भूमिपूजन. पंतप्रधानांचे संबाेधन होईल. त्यापूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण होईल.

कोरोना फॅक्टर : मोदींपासून लांब उभे राहणार पुजारी

> रामलल्लाचे पुजारी सत्येंद्र दासनुसार, पूजेवेळी मोदींजवळ कुणीही नसेल. मंत्रोच्चार करून जल शिंपडले जाणार नाही. कुणीही आरतीजवळ जाणार नाही. ताम्हण सजवून ठेवले जाईल.

> सर्व पाहुण्यांना काेराेना निगेटिव्हचे प्रमाणपत्र बंधनकारक. निगेटिव्ह रिपाेर्ट पाहिल्यानंतरच प्रवेश दिला जाईल.

बातम्या आणखी आहेत...