आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Bhumi Pujan With Alcohol In Gandhi's Own Gujarat, BTP MLA And Former BJP MLA Did Bhoomipujan Of Road

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गांधींच्या गुजरातमध्ये दारुबंदीची खिल्ली:भाजपचे माजी आमदार आणि बीटीपीच्या आमदाराने दारुने केले रस्त्याचे भूमीपूजन

नर्मदाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दारुमुक्त गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील डेडियापाडामध्ये नवीन रस्ता तयार होणार आहे. मागच्या शनिवारी या रस्त्याचे भूमीपूजन करण्यात आले. भारतीय ट्रायबल पार्टी (BTP) चे आमदार महेश वसासा आणि भाजपचे माजी आमदार मोती सिंह वसावासह अनेक नेते या भूमीपूजनाच्या कार्यक्रमात उपस्थित होते. विशेष म्हणजे, रस्त्याचे भूमीपूजन दारुने करण्यात आले. याबाबत विचारले असता, त्यांनी सांगितले की, अदिवासी परंपरेप्रमाणे भूमीपूजन केले आहे.

भूमीपूजनादरम्यान भाजप-काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते

भूमीपूजनादरम्यान मोतीसिंह वसावासोबतच नर्मदा जिल्हा पंचायतचे चेअरमन बहादुर वसावा, गुजरात प्रदेश भाजप आदिजाती मोर्चा प्रमुख, नर्मदा जिल्हा भाजप प्रमुख आणि माजी जिल्हा पंचायत प्रमुख शंकर वसावासह अनेक काँग्रेस नेते उपस्थित होते.

BTP आमदार म्हणाले- आदिवासी परंपरेचे पालन केले

BTP आमदार महेश वसावा म्हणाले की, भूमीपूजनावेळी आधी हळद-कुंकू लावले, नारळ फोडून पूजा केली. यानंतर आदिवासी परंपरेप्रमाणे दारुने अभिषेक केला. यादरम्यान उपस्थित आदिवासी नेत्यांनीही सांगितले की, ही त्यांची परंपरा आहे.