आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारत-भूतान संबंध:भूतानने अडवले असाममध्ये येणारे पाणी, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सीमा बंद केल्याची शक्यता

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • असामच्या 25 गावातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी 1953 पासून भूतान पाणी देत आलाय

भूतानकडून असामच्या शेतात यावर्षी पाणी येत नाहीये. 1953 पासून असामच्या बक्सा आणि उदालगुरी जिल्ह्यातील 25 गावांना सिंचनासाठी भूतानकडून पाणी मिळत आलाय. कोरोनामुळे भूतानने आपल्या सीमा बंद केल्यात आणि त्यातच पाणीदेखील बंद केल्याच्या चर्चा समोर आल्या आहेत. भूतानच्या परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी म्हटले की, याप्रकारच्या बातम्या योग्य नाहीत. आम्ही पाणी अडवले नाही, कालव्यांच्या डागडुजीचे काम सुरू असल्यामुळे पाणी सोडण्यात अडचणी येत आहेत.

असामच्या शेतकऱ्यांनी पाणी अडवल्यामुळे काही दिवसांपूर्वी कालीपुर-बोगाजुली-कालंदी आंचलिक डोंग बांध समितीच्या बॅनरअंतर्गत प्रदर्शन केले होते. शेतकऱ्यांनी मागणी केली होती की, केंद्र सरकारने भूतानला बोलून आम्हाला पाणी मिळवून द्यावे. वेळेवर पाणी न मिळाल्यास अंदाजे 5 हजार शेतकऱ्यांच्या शेतीवर परिणाम पडू शकतो. 

भूतानने कोरोनामुळे सीमा बंद केल्या

भूतानने म्हटले की, आम्ही कोरोना संक्रमण रोखण्यासाठी सीमा बंद केल्या आहेत. बाहेरुन आलेल्या कोणत्याही व्यक्तीला 21 क्वारेंटाइन राहावेच लागेल. दरवर्षी असामचे शेतकरी भूतानला जाऊन पाणी डायव्हर्ट करतात. परंतू, सध्याची परिस्थिती पाहता, असे करणे शक्य नाही. तरीदेखील पाण्याचा सप्लाय सुरुच ठेवण्यात आला होता. आमच्याकडे असामच्या शेतकऱ्यांसाठी पाणी उपलब्ध आहे, आम्ही विश्वास देतो की, शेतकऱ्यांना पाणी मिळून जाईल.

बातम्या आणखी आहेत...