आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन बाली येथे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत. 2020 मध्ये राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर जिनपिंग यांच्यासोबत बायडेन यांची ही पहिलीच आमने-सामने भेट असेल. यापूर्वी हे दोन्ही नेते देशाचे उपराष्ट्रपती असताना भेटले होते.
व्हाईट हाऊसच्या म्हणण्यानुसार, दोन्ही नेते अमेरिका आणि चीनमधील संवाद आणि संबंध अधिक दृढ करण्याच्या प्रयत्नांवर चर्चा करतील. याशिवाय चर्चेचा केंद्रबिंदू तैवानच्या मुद्द्यावर असेल.
चीनकडून सातत्याने तैवानवर हक्क सांगण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली जात असताना अमेरिकेकडून तैवानला पाठिंबा दर्शवण्यात आला आहे. चीनविरोधात युद्धात तैवानच्या बाजूने अमेरिका असेल, अशी घोषणा देखील करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि चीन या दोन्ही अण्वस्त्रधारी देशांमधील संबंध तणावपूर्ण आहेत.
अमेरिका तैवानबाबतचे धोरण बदलणार नाही
10 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषदेत बायडेन म्हणाले होते की,मी जिनपिंग यांच्याशी तैवानच्या मुद्द्यावर बोलेन. त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करू. तैवानबाबत अमेरिकेच्या धोरणात बदल करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चीनने तैवानवर हल्ला केल्यास अमेरिका तैवानच्या बचावासाठी मैदानात उतरेल, असे बायडेन यांनी अनेक वेळा म्हटले आहे.
नॅन्सी पेलोसी यांच्या भेटीनंतर तणाव आणखी वाढला
चीनच्या धमकीला न जुमानता अमेरिकेच्या संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी 2 ऑगस्ट रोजी तैवानच्या दौऱ्यावर तैपेईला पोहोचल्या. तेव्हा अमेरिका आणि चीनमधील तणाव आणखी वाढला. एएफपी न्यूज एजन्सीनुसार, चीनने म्हटले होते कीस आम्ही निश्चितपणे लक्ष्यित लष्करी कारवाई करू.
तेव्हापासून तैवानच्या हद्दीत चिनी विमानांची घुसखोरी वाढली आहे. सामान्यतः ही उड्डाणे तैवानच्या नैऋत्येकडील हवाई क्षेत्रामध्ये होतात. त्याला AIDZ (एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन) म्हणतात. 1949 मध्ये गृहयुद्धात तैवान आणि चीन वेगळे झाले, पण चीन या बेटावर दावा करत आहे. परिणामी, बीजिंग हे तैवान सरकारच्या प्रत्येक कृतीला विरोध करते. तैवानला एकटे पाडण्यासाठी आणि धमकावण्यासाठी मुत्सद्दी आणि लष्करी बळाचा वापर चीनकडून केला जातो.
तैवान कार्ड खेळणे थांबवावे
अमेरिकेला तैवान कार्ड खेळणे थांबवावे आणि चीनला रोखण्यासाठी तैवानचा वापर थांबवावा, असे आवाहन चीनने केले. तैवानचे स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या फुटीरतावादी शक्तींना मदत करणे अमेरिकेने बंद केले पाहिजे.
चीनने अमेरिकेला दिली होती धमकी
युक्रेनमधील युद्धाचा फायदा घेऊन चीन हा तैवानवर हल्ला करू शकतो. शी जिनपिंग यांचा कट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना जाणवला. यानंतर त्यांनी तातडीची बैठक घेतली आणि लगेचच अमेरिकेच्या संरक्षण तज्ञांचे आणि परराष्ट्र मंत्रालयाचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ तैवानची राजधानी तैपेई येथे पाठवण्यात आले. त्यानंतर चिडलेल्या चीनने अमेरिकेला धमकी दिली होती. अमेरिका आगीशी खेळत असून त्यात ते स्वत:ला जाळून घेतील, असे चीनने धमकीच्या स्वरात म्हटले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.