आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Big Accident In Kushinagar: 11 Died After Falling In A Well In Kushinagar, Uttar Pradesh | Marathi News |

हळदीचा विधी जिवावर बेतला:पुजा सुरू असताना विहिरीचा स्लॅब कोसळला, विहिरीत पडून 13 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये 10 मुलींचा समावेश

कुशीनगर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उत्तर प्रदेशच्या कुशीनगर येथील हृदयद्रावक घटना
  • मृत मुलींचे वय 5 ते 15 वर्षे, पीएम मोदी आणि सीएम योगींनी व्यक्त केले शोक
  • मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत

उत्तर प्रदेशाच्या कुशीनगर येथे बुधवारी रात्री एक हृदयद्रावक घटना घडली आहे. पुजा सुरू असताना विहिराच स्लॅब कोसळल्याने, पूजा करत असलेल्या महिला विहिरीत पडल्या. या घटनेत 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक दीड वर्षांचा चिमुकला, 10 लहान मुलींसह दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्री सुमारे 9.30 दरम्यान ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने घेतली. सुमारे रात्रभर बचावकार्य सुरू होते. या घटनेत सुमारे 25-30 महिला जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुशीनगरच्या नेबुआ नौरंगिया पोलिस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे.

विहिरीत बचाव करत असलेले गोताखोर. सकाळी पुन्हा एकदा विहिरीची तपासणी करण्यात आली.
विहिरीत बचाव करत असलेले गोताखोर. सकाळी पुन्हा एकदा विहिरीची तपासणी करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, नौरंगिया येथील रहिवासी परमेश्वर कुशवाहा यांच्या मुलांचा हळदीचे कार्यक्रम होते. त्यामुळे रात्री 9.30 दरम्यान गावातील 50-60 महिला आणि काही मुली गावातील मध्यभागी असलेल्या एका जुन्या विहिरीवर पुजेच्या विधीसाठी गेल्या होत्या. गावाच्या मध्यभागी ही विहिर असल्याने त्यावर काही वर्षांपुर्वी स्लॅब टाकण्यात आले होते. एकसोबत सर्व महिला पुजेसाठी त्या विहिरीच्या संरक्षण स्लॅबवर चढले असता, स्लॅब अचानक खाली विहिरीत कोसळले. त्यात पूजेसाठी गेलेल्या महिला खाली विहिरीत पडल्या.

आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून त्यात 10 मुलांचा समावेश आहे.
आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून त्यात 10 मुलांचा समावेश आहे.

जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा, त्याठिकाणी सर्व महिलाच होत्या. महिला खाली विहिरीत पडल्यानंतर त्यांनी आरडा-ओरड करण्यास सुरुवात केली. गावातील पुरुष मंडळी विहिरीकडे पोहोचण्यापूर्वी अनेक महिलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. विहीर खुप असल्याने या घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला आहे.

गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अंधार असल्याचे बचावकार्यास अडचण
परिसरात अंधार असल्याने बचावकार्यास मोठा अडथळा निर्माण झाला होता. गावातील नागरिकांनी मोबाईलच्या टॉर्चने आणि दुचाकी, चार चाकीच्या प्रकाशाने बचावकार्यास मदत केली. त्यानंतर घटनास्थळी पोलिस आणि बचाव पथक पोहोचले. पोलिसांनी सांगितले की, सर्वांना विहिरीतून काढण्यात आले असून, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 13 जणांचा या घटनेत मृत्यू झाला.

महिला म्हणाल्या - काय झाले कळालेच नाही

पूजेला गेलेल्या महिलांनी सांगितले की, काय झाले ते कोणालाच समजले नाही. पूजा सुरू असताना अचानक मोठा आवाज झाला आणि मुली आणि महिला खाली विहीरीत पडू लागल्या. मुलींनी एकमेकांना धरण्याचा प्रयत्न केला, पण अंधार असल्याने कोणालाच समजले नाही. घटनेनंतर 15-20 मिनिटे फक्त आरडाओरडा झाला. सगळे घाबरले होते. गावकरी आल्यावर पुन्हा बचावकार्य सुरू झाले. अंधार नसता तर कदाचित इतके मृत्यू झाले नसते. असे गावातील महिलांनी सांगितले आहे. ​​​​​​

अपघातानंतर लगेचच स्थानिक लोकांनी बचावकार्य सुरू केले, माहिती देऊनही रुग्णवाहिका उशिरा पोहोचल्याचा आरोपही लोकांनी केला आहे.
अपघातानंतर लगेचच स्थानिक लोकांनी बचावकार्य सुरू केले, माहिती देऊनही रुग्णवाहिका उशिरा पोहोचल्याचा आरोपही लोकांनी केला आहे.

रुग्णवाहिका एका तासानंतर पोहाचली
घटनेनंतर रुग्णवाहिकेने येण्यास वेळ लावला. तब्बल एक तास उशिराने रुग्णवाहिका पोहोचली. त्यामुळे गावातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. नागरिक म्हणाले की, वेळेवर रुग्णवाहिका आली नाही. त्यातच रुग्णालयात पोहोचले असता, तिथेही डॉक्टर नव्हते. त्यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने काही जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ज्या डॉक्टरांनी उपचारासाठी हलगर्जीपणा केला. त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

विहिरीतून बाहेर काढल्यानंतर 13 जणांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले.
विहिरीतून बाहेर काढल्यानंतर 13 जणांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले.

हृदयद्रावक घटना-मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुशीनगर दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. ही घटना हृदयद्रावक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. स्थानिक प्रशासन सर्वतोपरी मदत करत आहे. त्याचवेळी सीएम योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. प्रशासनाने मृतांच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.

बातम्या आणखी आहेत...