आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बंगल्यावरून टि्वटर वॉर:प्रियंकासाठी बड्या काँग्रेस नेत्याने केला फोन : केंद्रीय मंत्री पुरींचा दावा

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंतप्रधान मोदींनी मान्यता दिल्याचे वृत्त खोडसाळपणाचे - प्रियंका गांधी

काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी सरकारकडे लोधी इस्टेट बंगल्यात राहण्याचा अवधी वाढवून मागितल्याच्या वृत्तांचे खंडन केले आहे. प्रियंका म्हणाल्या, आदेशाप्रमाणे आपण १ ऑगस्ट रोजी हा बंगला सोडणार आहोत. प्रियंकाच्या टि्वटनंतर केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी म्हटले, प्रियंकाच्या रदबदलीसाठी एका बड्या काँग्रेस नेत्यांचा फोन होता. त्यांनी काँग्रेस खासदाराच्या नावे हा बंगला द्यावा त्यामुळे प्रियंकांना तेथेच राहता येईल.

कधी व कोणाचा फोन होता यावर पुरीचे टि्वट

केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी यासंदर्भात टि्वट करून सांगितले, त्यांना ४ जुलै रोजी दुपारी १२.०५ वाजता एका बड्या काँग्रेस नेत्यांचा फोन आला. लोधी इस्टेट बंगला अन्य काँग्रेस खासदारांच्या नावे अलॉट करावा. त्यामुळे प्रियंकांना तेथे राहता येईल. प्रियंकांनी या प्रकरणाचा गवगवा करू नये. विशेष म्हणजे, ३० जून रोजी गृह मंत्राललयाने नोटिस पाठवून एका महिन्यात प्रियंकांनी बंगला रिकामा करावा, असे म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींनी मान्यता दिल्याचे वृत्त खोडसाळपणाचे

मध्यंतरी एका माध्यमाने दिलेल्या वृत्तात प्रियंका गांधी यांनी सरकारी बंगल्यात आणखी काही काळ राहण्याची परवानगी मागितली आहे. पंतप्रधान माेदी यांनी त्यांची मागणी मान्य केल्याचे वृत्तात म्हटले होते. हे वृत्त खोडसाळ असल्याचे प्रियंकांनी म्हटले. माझ्या वतीने अशी कोणतीही मागणी केली नाही. प्रियंकांनी टि्वटमध्ये म्हटले , १ ऑगस्ट रोजी आपण हा बंगला सोडणार आहोत.