आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Big Decision Of CM Yogi In UP: Permission Required For Religious Procession, Loudspeaker Sound Should Not Be Heard Outside Religious Places

UP मध्ये CM योगींचा मोठा निर्णय:धार्मिक मिरवणुकीसाठी परवानगीची आवश्यकता, लाऊडस्पीकरचा आवाज धार्मिक स्थळाबाहेर जाऊ नये

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीत हनुमान जयंतीच्या मिरवणुकीत झालेल्या हिंसाचारानंतर योगी सरकार अतिशय सावध झाले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी योगी सरकारने सरकारी अधिकाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक सुचना जारी केली आहेत. त्यानुसार 4 मे पर्यंत सर्व सरकारी अधिकाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या असून रजेवर असलेल्या अ धिकाऱ्यांना24 तासांच्या आत कार्यालयात हजर होण्यास सांगण्यात आले आहे.

पोलिस ठाण्यापासून ते एडीजीपर्यंत धार्मिक गुरुंशी संपर्कात राहा

सोमवारी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये विभागीय आयुक्त, पोलिस आयुक्त, एडीजी झोन, सर्व विभागांचे आयजी आणि डीआयजी सहभागी झाले होते. मुख्यमंत्री म्हणाले की, आगामी काळात अनेक महत्त्वाचे धार्मिक सण आहेत. रमजानचा महिना सुरू आहे. ईद सण आणि अक्षय्य तृतीया एकाच दिवशी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अशा परिस्थितीत पोलिसांना अधिक दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. मुख्यमंत्र्यांचा आदेश आहे की पुढील 24 तासांत पोलिस स्टेशनपासून ते एडीजीपर्यंत आपापल्या भागातील धार्मिक गुरु आणि समाजातील इतर प्रतिष्ठित लोकांशी संवाद साधा. संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करा. ड्रोन वापरून परिस्थितीचे निरीक्षण करा. दररोज सायंकाळी पोलीस दलाने पायी पेट्रोलिंग करणे आवश्यक आहे. PRV 112 यांनी 24 तास अलर्ट राहावे

विभागीय आयुक्त, पोलिस आयुक्त, एडीजी झोन, सर्व विभागांचे आयजी आणि डीआयजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभागी
विभागीय आयुक्त, पोलिस आयुक्त, एडीजी झोन, सर्व विभागांचे आयजी आणि डीआयजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभागी

परवानगीशिवाय शोभा यात्रा निघणार नाही

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, धार्मिक विचारधारेनुसार प्रत्येकाला त्यांच्या उपासना पद्धतीचे पालन करण्याचे स्वातंत्र्य आहे. माईक वापरता येतो, पण त्याचा आवाज आवारातून बाहेर येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. इतर लोकांची गैरसोय होऊ नये. लाउडस्पीकरचा वापर धार्मिक कारणांसाठी करता येतो. नवीन ठिकाणी माइक लावू नका. परवानगीशिवाय शोभा यात्रा, मिरवणूक निघणार नाही. एकोपा बिघडू नये म्हणून आयोजकांना परवानगी साठी प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे.

धार्मिक मिरवणूक काढण्यासाठी आयोजकांना प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार. (फाइल फोटो)
धार्मिक मिरवणूक काढण्यासाठी आयोजकांना प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार. (फाइल फोटो)

सर्व नागरिकांची सुरक्षा ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. धार्मिक कार्यक्रम, पूजा इत्यादी नेमून दिलेल्या ठिकाणीच व्हावेत, असे निर्देशू मुख्यमंत्री योगींनी दिले आहेत. रस्ते, वाहतूक विस्कळीत करून कोणताही धार्मिक कार्यक्रम होणार नाही याची काळजी घ्या. प्रत्येक सण शांततेत पार पडावा यासाठी स्थानिक गरजा लक्षात घेऊन आवश्यक ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत. वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अराजक घटकांशी कठोरपणे व्यवहार करा. सुसंस्कृत समाजात अशा लोकांना स्थान नसावे. राज्यातील प्रत्येक नागरिकाची सुरक्षा ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आपल्या या जबाबदारीबद्दल आपण सदैव जागृत आणि सावध असले पाहिजे.तहसीलदार, SDM आणि TI यांनी नेमणूक दिलेल्या ठिकाणीच रात्रीची विश्रांती घ्यावी.

तहसीलदार, एसडीएम, एसएचओ आणि सीओ या सर्वांनी त्यांच्या नेमणूक परिसरात रात्री विश्रांती घ्यावी. सरकारी राहण्याची सोय असेल तर तिथेच राहा किंवा भाड्याचे घर घ्या, पण रात्री आपल्याच परिसरात राहा. ही व्यवस्था काटेकोरपणे पाळली पाहिजे. असे आदेश मुख्यमंत्री कार्यालयानकडून काढले गेले आहेत .

बातम्या आणखी आहेत...