आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान मोदी म्‍हणाले:लम्पीने मोठे नुकसान, 2025 पर्यंत गुरांचे लसीकरण

नोएडा21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रेटर नोएडामध्ये सोमवारी वर्ल्ड डेअरी समिट-२०२२ चे उद्‌घाटन केले. त्यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांत भारतातील अनेक राज्यांत लंपी आजारामुळे जनावरांचे नुकसान झाले. राज्य सरकारांसोबत मिळून केंद्र सरकार त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या शास्त्रज्ञांनी लंपी आजारावर स्वदेशी लस तयार करत आहेत. भारतात आपण प्राण्यांच्या वैश्विक लसीकरणावरही भर देत आहोत. २०२५ पर्यंत आपण शंभर टक्के प्राण्यांना फूट अँड माऊथ डिसीज आणि ब्रुसेलोसिसची लस देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आम्ही या दशकाच्या अखेरीस या आजाराचे संपूर्ण उच्चाटन करण्याचे ठरवले आहे. परिषदेत ५० देशांचे प्रतिनिधी, ८०० शेतकऱ्यांसह सुमारे १५०० प्रतिनिधी उपस्थित होते. केंद्रीय पशुपालन मंत्री पुरुषोत्तम रुपाला म्हणाले, १९७४ मध्ये देशात दुधाचे उत्पादन २.३ कोटी टन होते, हे २०२२ मध्ये दहापट वाढले.

बातम्या आणखी आहेत...