आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:वडील पेट्रोल पंपावर काम करतात, मुलाच्या फीसाठी विकले घर; यूपीएससी परीक्षा-2019 मध्ये टॉप विद्यार्थ्यांच्या यशामागे कुटुंबाचा मोठा संघर्ष

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पूर्वीच्या अयशस्वी तरुणांचा यंदा गुणवंतांत समावेश

यूपीएससी परीक्षा-२०१९ च्या निकालाने पुन्हा एकदा ‘प्रयत्न केल्यास अशक्य काहीही नसते’, हे सिद्ध केले आहे. पहिल्या प्रयत्नात अपेक्षित यशाने हुलकावणी दिलेल्या विद्यार्थ्यांनी जिद्दीने यश मिळवले. ते निराश झाले नाहीत. प्रयत्न आणि स्वत:वर विश्वास ठेवून ते यशस्वी ठरले. अशा विद्यार्थ्यांची संख्या यंदा जास्त आहे. अशा काही यशकथांबद्दल..

अक्रम तीन वर्षांपासून घरी गेले नव्हते, मणिपूरमधून दुसरे

मणिपूरचे नोंगजई मोहंमद अली अक्रम शाह यांनी चौथ्या प्रयत्नात यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांना १८८ वी रँक मिळाली. अक्रम म्हणाले, परीक्षेच्या तयारीमुळे गेल्या तीन वर्षांत घरी गेलो नाही. जामिया मिलिया इस्लामियाचे अक्रम या परीक्षेत यशस्वी होणारे मणिपूरचे केवळ दुसरे मुस्लिम तरुण आहेत.

जम्मू-काश्मीरच्या नादिया दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी

जम्मू-काश्मीर कुपवाडा जिल्ह्यातील नादिया बेग यांनी दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांना ३५० वी रँकिंग मिळाली. नादियाचे आई-वडील सरकारी शाळेत शिक्षक आहेत. त्या दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामियातील अर्थशास्त्राच्या विद्यार्थिनी आहेत.

परीक्षेच्या काळात आईची शस्त्रक्रिया, हिंमत हरले नाही

इंदूरचे प्रदीपकुमारसिंह यांना गेल्या वर्षी ९३ वी रँक मिळाली होती. त्यांना आयएएस व्हायचे होते. परंतु एका रँकने मागे राहिले. त्यांचे वडील मनोजसिंह पेट्रोल पंपावर काम करतात. प्रदीप यांनी पुन्हा तयारी सुरू केली. या वेळी २६ वी रँक घेऊन स्वप्न पूर्ण केले. मेन्स सुरू असतानाच आईची शस्त्रक्रिया चालू होती. प्रदीप यांच्या कोचिंगसाठी वडिलांनी घरही विकले होते.

गेल्या वर्षी ४८९ वी रँक, यंदा महिलांमध्ये टॉपर

यूपीची सुलतानपूरची प्रतिभा आयआयटीची विद्यार्थिनी. त्यांनी यूपीएससी २०१८ मध्ये ४८९ वी रँकिंग मिळवली होती. आयएएसचे स्वप्न पाहणाऱ्या प्रतिभा आयआरएस झाल्या. मात्र स्वप्न सोबत होते. सुटी घेऊन पुन्हा तयारी केली आणि यशस्वीही झाल्या. त्या महिलांत टॉपर आहेत. प्रतिभा यांनी आयआयटीतून शिक्षण पूर्ण केले.

बातम्या आणखी आहेत...