आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूच्या नशेत ट्रक डायव्हरने 30 जणांना चिरडले:8 जणांचा जागीच मृत्यू... यामध्ये 6 मुले, सर्वजण झाडाखाली पूजा करत होते

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दारूबंदी असलेल्या बिहारच्या वैशालीमध्ये दारूच्या नशेत ड्रायव्हरने 30 हून अधिक लोकांना चिरडले. यामध्ये 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये 6 मुलांचा समावेश आहे. हे सर्व लोक पिंपळाच्या झाडाखाली उभे राहून पूजा करत होते. तेवढ्यात 120च्या वेगाने एक ट्रक आला आणि लोकांना तुडवत निघून गेला. बोनेट आणि झाडाच्या मध्ये 2-3 जण दबले गेले.

सर्व मृतांचे वय 20 वर्षांपेक्षा कमी आहे. रविवारी रात्री नऊच्या सुमारास सुलतानपूर गावाजवळ हा अपघात झाला. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार चालक दारूच्या नशेत होता.

मृतांचे मृतदेह रस्त्यावर विखुरलेले असल्याने ट्रकचा वेग किती आहे याचा अंदाज लावता येतो. त्यांचे मृतदेह ट्रकच्या पुढच्या भागात अडकले, ते काढण्यासाठी ट्रकला गॅस कटरने कापावे लागले. यानंतरही त्यांचे अनेक अवयव ट्रकमध्ये लटकलेले होते.

मृतांमध्ये 6 मुलांचा समावेश आहे. गावकरी मनोज राय यांनी सांगितले की, घटनास्थळी रस्त्याच्या कडेला मंदिर बांधण्यात आले आहे. 50-60 वर्षांपासून तेथे पूजा केली जाते. आजपर्यंत अशी कोणतीही घटना तेथे घडलेली नाही. पिढ्यानपिढ्या लोक देवस्थळाची सेवा करत आहेत.

लोकांना धडकल्यानंतर ट्रक पिंपळाच्या झाडावर आदळला. चालक जखमी अवस्थेत स्टेअरिंगमध्ये अडकला. स्थानिक नागरिक आणि मृतांच्या नातेवाईकांशी दिव्य मराठीशी चर्चा केली. ट्रक ड्रायव्हर मद्यधुंद अवस्थेत होता, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

मृत सर्व 20 वर्षाखालील आहेत
मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये 8 वर्षांची वर्षा ते 20 वर्षांच्या चंदनाचा समावेश. ही सर्व मुले रविवारी सायंकाळी गावातील सर्वात जुन्या पिंपळाच्या झाडाजवळ भुईं बाबाची पूजा करण्यापूर्वी नेवतन विधीत सहभागी होण्यासाठी गेली होती. आता त्यांच्या मांसाच्या गुठळ्या त्याच झाडात अडकल्या आहेत. वर्षा कुमारी (8), सुरुची (12), अनुष्का (8), शिवानी (8) , खुशी (10), चन्दन(20), कोमल (10) आणि सतीश (17)

आर्मीची तयारी करत होता चंदन
चंदन गेल्या 2 वर्षांपासून सैन्यात भरती होण्याच्या तयारीत होता. वडिलांप्रमाणेच त्यालाही सैनिक बनून सीमेचे रक्षण करायचे होते. पुढील महिन्यात भरतीची परीक्षा होणार होती, त्यासाठी तो रात्रंदिवस मेहनत करत होता. आता तो कायमचा शांत झाला आहे.

झाड नसते तर 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असता
गावातील प्रत्यक्षदर्शी अनुज कुमार राय सांगतात की नेवतनची पूजा जवळपास पूर्ण झाली होती. सर्वजण आपापल्या घरी परतत असताना हाजीपूरहून माहनारच्या दिशेने जाणारा अनियंत्रित ट्रक डावीकडे येण्याऐवजी उजवीकडे आला आणि त्याने उपस्थित लोकांना चिरडले. यानंतर तो पिंपळाच्या झाडावर आदळला. अनुजच्या म्हणण्यानुसार, ट्रक झाडाला धडकला नसता तर किमान 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असता.

अपघातानंतर चालकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर चालकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

माझ्या डोळ्यासमोर नातीचा मृत्यू
या अपघातात 8 वर्षीय अनुष्काचाही मृत्यू झाला. अनुष्काचे आजोबा राजकुमार यांनी सांगितले की, बाबा भुईंच्या पूजेपूर्वी नेवतन कार्यक्रम सुरू होता. रस्त्याच्या कडेला असलेल्या पिंपळाच्या झाडाजवळ गावातील लोक फांद्या घेऊन उभे होते. यामध्ये लहान मुले, वृद्ध, महिला सर्वांचा सहभाग होता. 5.30 वाजता पूजा सुरू झाली. नऊच्या सुमारास ती संपणार होती. तेव्हा हाजीपूर बाजूने भरधाव वेगात आलेला ट्रक येथे उभ्या असलेल्या लोकांना चिरडत झाडावर आदळला. माझ्या डोळ्यासमोर नातीचा मृत्यू झाला.

पंतप्रधानांनीही शोक व्यक्त केला
पीएम मोदींनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली. जखमींना 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. वैशाली अपघातानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच जखमींवर उपचार करण्याच्या सूचना दिल्या.

बातम्या आणखी आहेत...