आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Bihar Assembly Election 2020 : Formula Of Seat Sharing In NDA Is Fixed, Bjp And Jdu Will Fight Elections On 119 199 Seats

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिहार विधानसभा निवडणूक:एनडीएचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, लोजपा बाहेर; निम्म्या जागांवर उमेदवार उभे करणार भाजप-जदयू

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 243 विधानसभा जागांसाठी 119-119 जागांवर जदयू आणि भाजप निवडणूक लढणार
  • 5 जागा 'हम'साठी सोडल्या, लोजपाला एनडीएतून बाहेर ठेवले

बिहारमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये तीन टप्प्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. महाआघाडीने शुक्रवारी सहयोगी पक्षांमध्ये जागांच्या वाटपाबाबत अंतिम शिक्कामोर्तब केला तर एनडीएतही तडकाफडकी जागावाटपाचा निर्णय झाला. सूत्रांनुसार, जदयू आणि भाजप 50-50 जागांवर निवडणूक लढवणार आहेत. विधानसभेच्या 243 जागांपैकी जदयू आणि भाजप 119-119 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. उर्वरित पाच जागा जीतनराम मांझींच्या हमसाठी सोडल्या. शनिवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत भाजप आणि जदयूने या फॉर्म्युल्यावर सहमती दर्शवली. लोजपाला मात्र यातून बाहेर ठेवले.

एनडीएच्या या जागावाटपाबाबत भाजप ठाम राहिला, याचा फायदा असा झाला की, जदयू ज्या ज्या जागांवर लढेल, त्याच जागेवर भाजपला लढावे लागेल. जदयूला भाजपपेक्षा सुमारे 15 ते 20 जागा जास्त लढवायच्या आहेत अशी चर्चा रंगली होती. मात्र भाजप नेता जागा वाटप बरोबरीत करण्यावर ठाम होते. यामुळे हा मुद्दा खेचला गेला. अखेर 50-50 चा फॉर्म्युला ठरला. मॅरेथॉन बैठकीनंतर भाजप नेता देवेंद्र फडणवीस आणि भूपेंद्र यादव दिल्लीसाठी रवाना झाले.

बातम्या आणखी आहेत...