आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Bihar Assembly Election 2020 News Update: Seats Formula Decided In Mahagathbandhan Grand Alliance

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिहार निवडणूक:महाआघाडीतील जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला; आरजेडी 145 आणि कॉंग्रेस 62 जागांवर निवडणूक लढवेल, अधिकृत घोषणा लवकरच

पटणा7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजदच्या कोट्यातूनच सपा आणि हेमंत सोरेन यांच्या झामुमोला जागा दिल्या जातील

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी महाआघाडीतील जागांचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. काही वेळातच याची अधिकृत घोषणा होईल. आतापर्यंत 150 पेक्षा जास्त जागांवर लढण्याचा दावा करणाऱ्या राजदला इतर पक्षांच्या नाराजीमुळे आपले मत बदलावे लागले आहे. या महाआघाडीमध्ये डावा पक्षही सहभागी होऊ शकतो. अशी माहिती आहे की, 2015 मध्ये तीन जागेवर विजय मिळवलेल्या भाकपा (माले) देखील सामील होईल. परंतू, मालेने यापूर्वीच तीस जागांवर आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे.

सूत्रांनी सांगितल्यानुसार, विधानसभेच्या 243 जागांपैकी राजद 145 जागांवर आपला उमेदवार उभा करेल. आतापर्यंत कमीत कमी 70 जागेंची मागणी करणाऱ्या काँग्रेसच्या खात्यात 62 जागा आल्या आहेत. 2015 मध्ये राजदने 100 आणि काँग्रेसने 43 जागांवर निवडणूक लढवली होती. यात राजदने 80 आणि काँग्रेसने 27 ठिकाणी विजय मिळवला होता.

डाव्यांची समजूत काढली जात आहे

जागा वाटपात होत असलेला उशीर आणि कमी जागा मिळण्याच्या भीतीने भाकपा मालेने याआधीच 30 उमेदवारांची घोषणा केली आहे. परंतू, आता म्हटले जात आहे की, मालेदेखील महाआघाडीत येऊ शकते. मालेसोबतच भाकपा आणि माकपादेखील महाआघाडीचा भाग असतील. भाकपा आणि माकपाला 5-5 जागा मिळू शकत्यात. तर, मागच्या वेळेस तीन जागा जिंकणाऱ्या आणि 21 जागांवर तिसऱ्या नंबरवर राहिलेल्या मालेला 15 जागा मिळू शकतात.

झामुमो आणि वीआयपीदेखील सोबत असतील, सपाला राजदच्या कोट्यातून जागा मिळतील

मुकेश सहनी यांच्या वीआयपी पक्षाला 9 जागा मिळू शकतात. तर, झारखंड मुक्ती मोर्चाला 2 जागा मिळण्याची शक्यता आहे. समाजवादी पार्टीसाठी किती आणि कुठे जागा द्यायच्या, हे राजद ठरवेल. एक-दोन जागा इकडे-तिकडे होऊ शकतात, पण हा फॉर्म्यूला पक्का आहे.

बातम्या आणखी आहेत...