आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Bihar Assembly Election 2020: RJD Candidates, 'Saints' Will Fight The Most Tarnished Candidate In The Elections; Murder Cases Against One, The Other Away From Slander

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिहार महाभारत 2020:सर्वाधिक कलंकित उमेदवाराशी निवडणुकीत ‘संत’ लढणार; एकावर हत्येसारखे खटले, दुसरा अपशब्दापासूनही दूर

पाटणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिहार निवडणुकीत राजदने सर्वाधिक 29 कलंकितांना उमेदवारी दिली

बिहारच्या मोकामा विधानसभा मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. येथील कलंकित उमेदवार अनंत सिंह यांच्याविरोधात जदयूचे राजीव लोचन नारायण सिंह निवडणूक मैदानात उतरले आहेत. अनंत यांच्यावर ३८ खटले आहेत.

पहिल्या टप्प्यात उभ्या असलेल्या एकूण उमेदवारांत सर्वाधिक खटले अनंत यांच्यावर आहेत. त्यांच्यावर हत्या, अपहरण, बेकायदा शस्त्रे बाळगणे, खंडणीसारखे आरोप आहेत. दुसरीकडे राजीव लोचन यांच्यावर अपशब्द बोलल्याचादेखील आरोप नाही. राजीव लोचन हे पूर्वाश्रमीचे शेतकरी नेते आहेत. त्यांची प्रतिमा स्वच्छ नेत्याची राहिली आहे. त्यांचे वडील माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे मित्र होते. अनंत सिंह २००५ व २०२० च्या निवडणुकीत जदयूच्या तिकिटावर विजयी झाले होते. २०१५ मध्ये त्यांच्यावर हत्येचा आरोप होता. त्यामुळे जदयूने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. तेव्हा अनंत सिंह यांनी अपक्ष निवडणूक लढवली. त्यांनी जेडीयूच्या उमेदवारास १८ हजार मतांनी पराभूत केले. आता ते राजदकडून लढत आहेत.

पहिला टप्पा : अनंत यांच्यानंतर सुधीर वर्मा सर्वाधिक कलंकित

बिहारमध्ये ७१ जागांसाठी पहिल्या टप्प्यात २८ रोजी मतदान होईल. यात १०६५ उमेदवार उभे आहेत. राजदने सर्वाधिक २९ कलंकितांना उमेदवारी दिली. भाजप-लोजपा-जापने प्रत्येकी २१ उमेदवार उतरवले. मोकामा मतदारसंघातून अनंत सिंह यांच्यानंतर दुसऱ्या स्थानी सुधीरकुमार वर्मा आहेत. त्यांच्यावर ३७ खटले आहेत. सुधीर गुरूआ मतदारसंघातून लढत आहेत.

भाजपची नालंदा येथे रॅली : मोदींनी निवडणूक संस्कृतीत बदल केला - नड्डा

भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी नालंदाच्या बाल लखीसराय येथे जाहीर सभा घेतली. त्यांनी सभेत विरोधकांवर निशाणा साधला. पूर्वी लोक गंगा, डावे-उजवे इत्यादीच्या नावावर निवडणूक लढवत होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक लढवण्याची संस्कृती बदलून टाकली. आता लोक काम किती केले? हे दाखवून मत मागतात. जातीच्या नावावर मत मागण्याची हिंमत आता कोणातही नाही. काँग्रेसने राम मंदिराच्या मुद्द्याला लटकवत ठेवले. राजदच्या शासनकाळात बिहार अपहरण उद्योग बनला होता, असेही नड्डा यांनी सांगितले. नड्डा यांनी बिहारमध्ये प्रचाराचा धडाका लावला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले.