आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bihar Assembly Election 2020 Updates : Bihar Leads To Rajnath Singh Adityanath Yogi, Narendra Modi Busy Preparing For West Bengal

बिहार विधानसभा 2020:बिहारची आघाडी राजनाथ सिंह- आदित्यनाथ योगींकडे, नरेंद्र मोदी पश्चिम बंगालच्या तयारीत व्यग्र

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लालूंच्या स्नुषेने घेतले नितीश यांचे आशीर्वाद - Divya Marathi
लालूंच्या स्नुषेने घेतले नितीश यांचे आशीर्वाद
  • नवादात 23 ला राहुल गांधी व तेजस्वी यादव यांची संयुक्त सभा

बिहार विधानसभा निवडणुकीला सात दिवस बाकी आहेत. भाजप शक्तीनिशी प्रचारात व्यग्र आहे. भाजप नेते जे.पी. नड्डा यांनी बुधवारी पश्चिम चंपारण व पूर्व चंपारणमध्ये जाहीर सभा घेतल्या. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह व संरक्षण राज्यमंत्री प्रचारासाठी भागलपूर येथे पोहोचले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जमुई येथे सभा घेतली. गेल्या काही दिवसांपासून भाजपचे अनेक दिग्गज बिहारमध्ये प्रचारासाठी तळ ठोकून आहेत. दुसरीकडे नवादात २३ ऑक्टोबरला काँग्रेस खासदार राहुल गांधी व राजद नेता तेजस्वी यादव यांची संयुक्त सभा होईल. निवडणूक तोंडावर असली तरी भाजपने पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारीदेखील आतापासून सुरू केली आहे. भाजपने गुरुवारी राज्यातील सर्व २९४ विधानसभा मतदारसंघांतील ७८ हजार मतदान केंद्रांच्या परिसरात पुजोर शुभेच्छा (पूजेच्या सदिच्छा) कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात व्हिडिआे कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांना दुर्गापूजेनिमित्त शुभेच्छा संदेश देतील. कार्यक्रमाचे सर्व केंद्रांवर थेट प्रसारण केले जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर २५ हून जास्त कार्यकर्ते तैनात राहतील.

लालूंच्या स्नुषेने घेतले नितीश यांचे आशीर्वाद

परसाच्या जाहीर सभेत राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या स्नुषा ऐश्वर्या या मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या पाया पडल्या. लालूंचे पुत्र तेजप्रताप यांच्या त्या पत्नी होत. ऐश्वर्या यांचे वडील चंद्रिका राय परसा मतदारसंघातून जदयूचे उमेदवार आहेत. वडिलांसाठी मत मागायला आल्याची प्रतिक्रिया ऐश्वर्या यांनी दिली.

पहिला टप्पा : राजदने सर्वाधिक ७३ टक्के कलंकितांना दिले तिकीट

बिहारमध्ये निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १०६६ उमेदवार आहेत. बिहार इलेक्शन वॉच व एडीआरनुसार १०६४ उमेदवारांच्या शपथपत्राचे विश्लेषण करण्यात आले. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ३१ टक्के उमेदवारांवर गुन्हेगारी खटले चालू आहेत. राजकीय पक्षांच्या दृष्टीने पाहिल्यास राजदने सर्वाधिक ७३ टक्के कलंकित उमेदवारांना तिकीट दिले आहे. त्यानंतर भाजपने ७२ टक्के लोजपा-५९ टक्के कलंकित उमेदवारांना मैदानात उतरवले. राजदचे ४१ पैकी ३०, भाजपचे २९ पैकी २१ व लोजपाचे ४१ पैकी २४ उमेदवारी कलंकित आहेत. पहिल्या टप्प्यात ७१ जागांवर मतदान प्रक्रिया राबवली जाईल.

बातम्या आणखी आहेत...