आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Bihar Bhagalpur Boat Accident Update | Boat Carrying 100 People Capsizes In Gopalpur Area, National Disaster Response Force

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गंगा नदीत बोट बुडाली:बोटीत सवार 150 लोकांपैकी एकाचा मृत्यू, 7 जण बेपत्ता; 100 लोक स्वतः पोहत बाहेर आले, बिहारमधील घटना

भागलपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ओव्हरलोडिंगमुळे झाला अपघात, बोटीत महिलांसह 40 मुलांचा होता समावेश

भागलपूरमध्ये नवगछियाच्या गोपाळपूर पोलिस स्टेशन परिसरातील तिनटंगा दियारात मोठी दुर्घटना घडली. येथे एक बोट पलटल्याने अनेक लोक बुडाले असून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या बोटीत जवळपास 150 लोक होते, यातील बरेच लोक पोहत किनाऱ्यावर पोहोचले. स्थानिक नागरिकांनी 12 लोकांना बाहेर काढले. यापैकी एका महिलेचा मृत्यू झाला आहे तर 11 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एनडीआरएफच्या दोन बोटी बोटीतील उर्वरित लोकांचा शोध आहेत. दरम्यान या बोटीत महिलांसह 40 मुले होती. ओव्हरलोडिंगमुळे दुर्घटना झाल्याचे प्राथमिक निदर्शनात दिसते.

जहाजाच्या घाटजवळ हा अपघात झाला

स्थानिक लोकांनी सांगितल्यानुसार, सकाळी साडेआठ वाजता ही दुर्घटना घडली. प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले की, नावेत बरेच लोक सवार होते. नाव घाटापासून पुढे जाताच पलटली. नावेत अनेक महिला आणि मुले देखील होती. या दुर्घटनेत प्रेमलता देवी, चांदनी देवेी, मनिषा कुमारी, राणी देवी, खैरा देवी, शर्मिला देवी, प्रमिला देवी आणि इंदिरा देवी या महिला जखमी झाल्या आहेत.

अपघातामुळे गावात अनागोंदीचे वातावरण आहे. जखमींवर स्थानिक पीएचसी रुग्णालयात उपचार सुरू आहे. बोटीमध्ये बसलेल्या बर्‍याच लोकांचा अद्याप शोध लागला नाही असे स्थानिकांनी सांगितले. एसडीआरएफची टीम हरवलेल्या लोकांचा सतत शोध घेत आहे. युद्धपातळीवर ही शोधमोहिम सुरू आहे. भागलपूर डीएम-एसपी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.