आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिहारच्या भोजपूरमध्ये एका बापाने आपल्या मुलीचा जळालेला पाय पिशवीत घेऊन पोलीस ठाणे गाठले. वडिलांनी मोठा टाहो फोडला. ते म्हणाले, 'मला न्याय हवा आहे. माझ्या मुलीचा पाय या पिशवीत आहेत. बाकी शरीर सासरच्या मंडळींनी जाळले. मी पोलिसांसह पोहोचलो तोपर्यंत ती पूर्णपणे जळून गेली होती. तिचा एक पाय तेवढा शिल्लक होता. पोलिसांच्या मदतीनेच तो गोळा करून आणू शकलो. ही माझी मुलगी ममता आहे, हे मला तिच्या पैंजणांवरून ओळखता आले."
हे प्रकरण मुफसिल पोलीस ठाण्याच्या बरौली गावातील आहे, जिथे अखिलेश बिंद यांची मुलगी ममता हिची सोमवारी रात्री पती आणि सासरच्यांनी हत्या केली. आधी मृतदेह वाळूत पुरण्यात आला. नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्यात आला. अखिलेश पोलिसांपर्यंत पोहोचेपर्यंत मृतदेह जळाला होता.
फक्त डाव्या पायाचा थोडासा भाग उरला होता, तो घेऊन मृत विवाहितेच्या वडिलांनी पोलीस ठाणे गाठले. गुरुवारी हा पाय पाटणा येथे डीएनए चाचणीसाठी पाठवण्यात आला होता. याप्रकरणी FIR दाखल करण्यात आला आहे.
एक वर्षापूर्वी झाले लग्न
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ममतांचे गेल्या वर्षी मे महिन्यातच लग्न झाले होते. काही वेळाने आणखी एक लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली. सासरे म्हणाले- मुलाला व्यवसाय करायचा आहे. मुलीचे कुटुंब पैसे देऊ शकत नसल्याने सोमवारी रात्री उशिरा पती शत्रुघ्न बिंद आणि सासरे राम प्यारे बिंद यांनी ममताची हत्या केली. पुरावा पुसण्यासाठी सारीपूर विष्णुपूर गावात सोन नदीच्या काठावर मृतदेह पुरण्यात आला.
काही तासांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि मग तो जाळला. दरम्यान, मृत ममताचे वडील पोलिसांसह पोहोचले, तोपर्यंत आरोपी फरार झाला होता. मुलीचे बाकीचे शरीर जळाले होते. डावा पाय तेवढा बाकी होता. पोलिसांनी तो तपासासाठी उचलला. त्या पायात पैंजण होते. त्यामुळे अखिलेश बिंद आपल्या मुलीला ओळखू शकले.
DNA टेस्टसाठी पाठवला पाय
भोजपूरचे एएसपी हिमांशू यांनी सांगितले की, मृतदेहाच्या पडताळणीसाठी डीएनए चाचणी केली जाईल, ज्यासाठी तो पाय पाटणा फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे.
दरम्यान, ज्या वाहनातून ममताला अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले त्या वाहनाच्या चालकाला लोकांनी पकडले आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहेत.
आधी वाळूत पुरले, नंतर काढून जाळले
मृत ममतादेवीचे वडील अखिलेश बिंद आणि मोठे मामा बेगिन बिंद यांनी सांगितले की, ममताने दोन दिवसांपूर्वीच तिच्या काकूंना फोनवर सांगितले होते की, तिचा पती आणि सासरे राम प्यारे एक लाख रुपये मागत आहेत. पैसे नव्हते म्हणून देऊ शकलो नाही. यानंतर सासरच्यांनी ममताचा खून करून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
आरोपी मृतदेह किरायाच्या गाडीत घेऊन रेती घाटावर गेला. तेथे मृतदेह प्रथम वाळूत पुरण्यात आला. त्यानंतर चालकाला हाकलून दिले. यानंतर मृतदेह वाळूतून काढून जाळण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.