आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिहारच्या बेगुसराय जिल्ह्यात एक तरुण दुचाकीसह जिवंत जळाला. या तरुणाची बाइक प्रथम एका मिनी ट्रकला धडकली. त्यानंतर तिने लगेचच पेट घेतला. त्यात या तरुणाचा दुचाकीवरच बसलेल्या स्थितीत कोळसा झाला.
बेगुसरायच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 28 वर सोमवारी रात्री 10 च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेचे व्हिडिओ व छायाचित्र अत्यंत विचलित करणारे आहेत. त्यात युवकाचा पूर्णतः कोळसा झाल्याचे दिसून येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच बरौनी पोलिस व अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवून तरुणाचा मृतदेह रुग्णालयात हलवला. मंगळवारी सकाळी तरुणाची ओळख पटली.
3 महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, हुंड्यात मिळाली होती बाइक
संजीत कुमार (26) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो तेघरा पोलिस ठाणे हद्दीतील अंबा गावचा रहिवासी होता. संजीत रिफायनरी पोलिस ठाणे हद्दीतील मोसादपूर येथील आपल्या सासुरवाडीत जात होता. रस्त्यात त्याची दुचाकी झिरो माइललगतच्या एका ओव्हरब्रिजवर मिनी ट्रकला धडकली. यामुळे पेट्रोल लिक झाल्याने दुचाकीला आग लागली.
नागों तांती यांनी सांगितले की, मृत तरुणाचे गत डिसेंबर महिन्यात लग्न झाले होते. लग्नात त्याला नवी पल्सर बाइक मिळाली होती. तो गुडगावमध्ये राहून मजुरी करत होता. 4 मार्च रोजीच तो घरी परतला होता. तो 5 मार्च रोजी सायंकाळी होळी साजरी करण्यासाठी दुचाकीवरून आपल्या सासुरवाडीला जात होता.
बाइकचा जळालेला नंबर प्लेट.
नातेवाईकांनी सांगितले की, संजीत रात्री उशिरापर्यंत आपल्या सासुरवाडीला पोहोचला नाही. त्यामुळे त्याचा शोध सुरू झाला. त्यानंतर सकाळी सोशल मीडिया ग्रुपवर एका तरुणाचा दुचाकीवर जळून मृत्यू झाल्याची बातमी वाचली. याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही बरौनी ठाण्यात पोहोचलो. तिथे दुचाकीच्या जळालेल्या नंबर प्लेटवरून मृताची ओळख पटली. या घटनेनंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.