आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअग्निपथ योजनेच्या विरोधात बिहारमध्ये चार दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचारावरून सत्ताधारी भाजप व जदयू नेते आमने-सामने आले आहेत. जदयूने पहिल्या दिवसापासून योजनेवरून केंद्र सरकारने फेरविचार करण्याची मागणी केली. त्याच वेळी निदर्शकांनी बिहारमध्ये पक्षनेते व कार्यालयाला लक्ष्य केल्यावरून भाजपने नाराजी व्यक्त केली. बिहार भाजप अध्यक्ष संजय जायस्वाल म्हणाले, बिहारमध्ये भाजपला लक्ष्य केले जात आहे. संपूर्ण प्रकरणात पोलिस प्रशासन मौन धारण करून आहे. जायस्वाल म्हणाले, राज्यात केंद्राच्या चांगल्या योजनेला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. तरुणांची दिशाभूल केली जात आहे. चार दिवसांपासून गदारोळात प्रशासनाची भूमिका योग्य नाही. पक्ष कार्यालयात जाळपोळ झाली. त्यावर प्रशासन मूक आहे.
उपमुख्यमंत्री रेणुदेवी यांच्या निवासस्थानी हल्ला झाला. त्यावर जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह म्हणाले, अग्निपथ योजनेवरून केंद्र सरकारच्या निर्णयावर केवळ बिहारच नव्हे तर इतर राज्यांतही तरुणांच्या मनात भविष्याबद्दल चिंता निर्माण झाली आहे. त्याला स्वीकारले जाऊ शकत नाही. भाजपने या चिंता लक्षात घ्याव्या. त्यापासून दूर राहिले पाहिजे. परंतु हे करण्याऐवजी भाजप नेते प्रशासनावर आरोप करत आहेत. ललन सिंह यांनी भाजपवर पलटवार केला. ते म्हणाले, विद्यार्थी व तरुणांचा असंतोष असल्यामुळे त्यांचे संतुलन बिघडले आहे. म्हणूनच ते प्रशासनावर बिनबुडाचे आरोप करत आहेत. प्रशासन कसे चालवायचे हे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना ठाऊक आहे. त्यांना संजय जायस्वाल यांच्याकडून शिकण्याची गरज नाही. तसे असल्यास उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेशात अशा घटना का घडत आहेत?
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.