आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारमध्ये भाजप आमदाराची विधानसभेतून उचलबांगडी:मार्शल्सनी काढले बाहेर; सदनात भाजप आमदारांचा गोंधळ, अध्यक्ष संतापले

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिहार विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यातील हिंसेच्या मुद्द्यावरून भाजप आमदारांनी जोरदार गोंधळ घातला. यानंतर मार्शल्सनी गोंधळ घालणारे भाजप आमदार जीवेश मिश्रांना उचलबांगडी करत सदनाच्या बाहेर काढले. याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसेवरून आमदार मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे उत्तराची मागणी करत होते. अध्यक्षांनी त्यांना 2-3 वेळा बसायला सांगितले. त्यांनी ऐकले नाही तेव्हा अध्यक्षांनी मार्शल्सना बोलावून आमदार जीवेश मिश्रांना बाहेर काढण्याचे आदेश दिले.

यानंतर सदनाचे कामकाज तहकूब करण्यात आले. कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर अध्यक्षांनी समारोपाचे भाषण करत सदन अनिश्चितकाळासाठी तहकूब केले.

आता काही फोटो बघा...

भाजप आमदार मिश्रा म्हणाले - सदनात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही नव्हते. मी त्यांच्याकडून उत्तराची मागणी करत होतो.
भाजप आमदार मिश्रा म्हणाले - सदनात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही नव्हते. मी त्यांच्याकडून उत्तराची मागणी करत होतो.
सासाराम आणि बिहार शरिफमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या हिंसेवरून विरोधक भाजप आमदारांनी नितीश सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.
सासाराम आणि बिहार शरिफमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या हिंसेवरून विरोधक भाजप आमदारांनी नितीश सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.

सदनातून मार्शल्सद्वारे बाहेर काढण्यात आलेले आमदार जीवेश मिश्रांनी आरोप केला की सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. मी तर केवळ बिहारमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविषयी प्रश्न विचारला होता. मुख्यमंत्र्यांकडून उत्तराची मागणी केली होती.

स्पीकर यांनी मार्शल्सना बोलावून मला सदनाबाहेर काढले. सदनात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही नव्हते. मी तर त्यांना बोलावून उत्तर देण्याची मागणी करत होतो. अध्यक्षांच्या कारवाईनंतर भाजप आमदारांनी सदनातून वॉकआऊट केले.

सासाराम आणि बिहार शरीफमधील रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या हिंसेवरून विरोधक भाजप नितीश सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपचे म्हणणे आहे की सरकारच्या नाकर्तेपणामुळेच हिंसेच्या घटना घडल्या आहेत. तर सत्ताधारी आमदारांचा आरोप आहे की भाजपनेच नियोजित कटानुसार रामनवमीदरम्यान हिंसा पसरवण्याचे काम केले आहे.

हिंसेविरोधात सदनाबाहेर आंदोलन करणारे भाजप आमदार
हिंसेविरोधात सदनाबाहेर आंदोलन करणारे भाजप आमदार
भाकप-मालेच्या आमदारांनीही हिंसेविरोधात आंदोलन केले
भाकप-मालेच्या आमदारांनीही हिंसेविरोधात आंदोलन केले

भाजपने एनआयए चौकशीची मागणी केली

बिहार हिंसेवरून भाजप आमदारांनी एनआयए चौकशीची मागणी करताना सदनात जोरदार नारेबाजी केली. विजय कुमार सिन्हांनी कायदा व सुव्यवस्थेवरूनही सरकारला घेरले. ते म्हणाले की दारुमुळे मृत्यू होत आहेत. वाळू माफियांना कुणाचीही भिती राहिली नाही. हत्या होत आहेत. पोलिसांना मारहाण केली जात आहे. सरकार गप्प बसले आहे.

विरोधी पक्षनेते विजय सिन्हा म्हणाले की, सदनाच्या आता मुख्यमंत्रीही नाही कि उपमुख्यमंत्रीही नाही. हिंसाचारावर उत्तर देण्यापासून सरकार पळ काढत आहे. आम्ही हेच म्हटले की या प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यायला हवे. मात्र एकतर्फी कारवाई करत आमच्या आमदारांना मार्शल्सकडून बाहेर काढले गेले. या प्रकरणात सदनापासून ते रस्त्यावर लढाई आम्ही लढू.

भाजपच्या इशाऱ्यावर हिंसा

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री राबडी देवी म्हणाल्या की नालंदा आणि सासाराममध्ये भाजपच्या इशाऱ्यावर हिंसाचार झाला. सरकारने याचा तपास करायला हवा. जेही दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. केंद्रिय गृहमंत्री अमित शहांनी बिहारमध्ये दिलेल्या विधानावर म्हणाल्या की देश आणि बिहारमधील जनताच त्यांना उलटे करेल.