आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bihar CBI Raid At Rabri Residence; Lalu Yadav Wife Rabri Devi | Tejashwi Yadav | Lalu Yadav | Bihar

राबडी देवींच्या घरी CBI पथक, चौकशी सुरू:जमिनीच्या बदल्यात नोकरी दिल्याप्रकरणी कारवाई, DCM तेजस्वी यादव विधानसभेत

पाटणा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीबीआयचे पथक लालू यादव यांच्या पत्नी आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या पाटणा येथील (10, सर्क्युलर रोड) निवासस्थानी पोहोचले आहे. सीबीआयचे पथक दोन ते तीन गाड्यांमध्ये अचानक राबडी निवासस्थानी आले. गेल्या काही तासांपासून ही चौकशीला सुरूवात झाली आहे. रेल्वे विभागातील जमीन आणि नोकर भरती प्रकरणात ही चौकशी केली जात असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव सद्या विधानसभेच्या कामकाजासाठी रवाना झाले आहेत.

सीबीआयने गतवर्षी मे व ऑगस्टमध्ये छापे टाकले

मे 2022 मध्ये, लालूं यांच्या व्यतिरिक्त, सीबीआयने लालूंच्या पत्नी राबडी देवी, दोन मुली मीसा भारती आणि हेमा यादव यांच्यासह त्यांच्या जवळच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या 17 ठिकाणी छापे टाकले होते.

सीबीआयने या वर्षी मे महिन्यात लालू यादव, त्यांच्या पत्नी आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी, त्यांच्या मुली मिसा यादव आणि हेमा यादव यांच्यासह 16 जणांची नावे आरोपी म्हणून घोषित केली होती. याशिवाय काही अपात्र उमेदवारांना नोकरीच्या बदल्यात कमी किमतीत जमीन देऊ केली होती. त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 24 ऑगस्ट 2022 रोजी सीबीआयने पुन्हा एकदा आरजेडी नेत्यांवर छापे टाकले होते.

नोकरी घोटाळ्याशी संबंधित प्रकरण
लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना (2004 ते 2009) या कालावधीत नोकरीसाठी जमीन घोटाळा झाला. नोकरीसाठी जमीन घोटाळ्यात लालू आणि त्यांच्या कुटुंबीयांवर रेल्वेत नोकरी देण्याच्या बदल्यात जमीन घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सीबीआयने मे 2022 मध्ये लालू आणि त्यांच्या कुटुंबीयांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता.

सीबीआयच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारे लालू यादव यांच्या कुटुंबीयांनी बिहारमध्ये 1 लाख चौरस फूट जमीन केवळ 26 लाख रुपयांमध्ये विकत घेतली. तर त्यावेळच्या सर्कल रेटनुसार या जमिनीची किंमत सुमारे 4.39 कोटी रुपये होती. विशेष बाब म्हणजे जमीन हस्तांतरणाच्या बहुतांश प्रकरणांमध्ये जमीन मालकाला रोख रक्कम दिली जात होती.

हे ही वाचा

लालूंविरोधात CBI सक्रीय, खटला पुन्हा सुरू : रेल्वेमंत्री असताना प्रकल्पात भ्रष्टाचार, तेजस्वी, राबडी यांच्यासह दोन मुलींची नावे

राजद सुप्रीमो लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांसमोरच्या अडचणी पुन्हा एकदा वाढू शकतात. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला एक खटला सीबीआयने पुन्हा उघडला आहे. हे प्रकरणही भ्रष्टाचाराशी संबंधित आहे. लालू यादव यांच्याशिवाय त्यांचा मुलगा आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि 2 मुली चंदा यादव आणि रागिणी यादव यांचाही आरोपींमध्ये समावेश आहे. - येथे वाचा संपूर्ण बातमी

बातम्या आणखी आहेत...