आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूविरोधात जनजागृती अभियान:बिहारचे मुख्यमंत्री नितीश म्हणाले, ‘प्याल तर मराल’

पाटणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बिहारच्या छपरामध्ये विषारी दारूमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढून ५० झाली आहे. गुरुवारी २३ लोकांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले, सर्वांच्या सहमतीने दारूबंदी झाली तेव्हा भाजप मृतांच्या कुटुंबीयांसाठी मोबदल्याची मागणी का करत आहे? भाजपची सत्ता असलेल्या राज्यांत विषारी दारूमुळे किती जणांचा मृत्यू झाला? त्या राज्यांत जिथे दारूबंदी नाही तिथे विषारी दारूमुळे मृत्यू होत नाहीत का? नीतीशकुमार म्हणाले, ‘दारू प्याल तर मराल’ हे मी सातत्याने सांगत आहे. दारूविरोधात जनजागृती अभियान राबवण्यासह कारवाईमुळे १.६४ कोटी लोकांनी दारू सोडली.

बातम्या आणखी आहेत...