आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना आणि लॉकडाउनमुळे देशभर कोट्यावधी गरीब लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. हातावरचे पोट भागवण्यासाठी लोक हजारो किमीचा पायी प्रवास करतानाही आपण पाहिलेच. बिहारमध्ये अशीच परिस्थिती आलेल्या एका कुटुंबाच्या मदतीला न्यायालय समोर आले. नालंदा जिल्ह्यातील कोर्टात एका मुलाला चोरीच्या आरोपावरून हजर करण्यात आले. तपासात समोर आले की अत्यंत गरीब कुटुंबाच्या या मुलाची आई भुकेने तडपत होती. त्याच आईची भूक मुलाला सहन झाली नाही आणि त्याने चोरी केली. न्यायाधीशांना ही गोष्ट समजल्यानंतर त्यांनी त्या मुलाला केवळ माफ केले नाही, तर त्याच्या जेवण आणि कपड्यांची व्यवस्था देखील केली.
शिधापत्रिका, गृह निर्माणसह सर्वच योजना पुरवण्याचे कोर्टाचे आदेश
पोलिसांनी नालंदाच्या एका झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलाला ताब्यात घेऊन न्यायाधीश मानवेंद्र मिश्र यांच्यासमोर हजर केले. त्यांनी अल्पवयीन असलेल्या मुलाची विवशता समजून घेतली आणि त्याला आरोपातून मुक्त केले. एवढेच नव्हे, तर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्याला शक्य ती सर्व प्रकारची मदत करण्याचे आदेश दिले. यासोबतच आता स्थानिक पोलिस आणि प्रशासनाला या मुलाचा स्टेटस रिपोर्ट चार महिन्यात कोर्टात सादर करावा लागणार आहे. न्यायाधीशांनी या मुलाच्या परिसरात गट विकास अधिकाऱ्यांसाठी देखील आदेश काढताना त्याच्या कुटुंबाला आधार कार्ड, शिधा पत्रिका, आईसाठी विध्वा पेन्शन योजना आणि गृह निर्माणसाठी अनुदान देण्याकरिता सर्व आवश्यक कागदपत्रे तयार करण्यास सांगितले आहे.
वडिलांचे निधन, आईसह लहान भावाचीही होती जबाबदारी
या मुलाच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले. तेव्हापासून कुटुंबाची अवस्था अतिशय दयनीय झाली. आई खाण्या-पिण्यासाठी पूर्णपणे या मुलावर विसंबून होती. सोबतच, या मुलाला एक लहान भाऊ देखील आहे. त्या एकट्या मुलावरच घराची पूर्ण जबाबदारी आहे. कुठेही काम करून पोट भरण्याइतके कमाई करणारा हा मुलगा लॉकडाउनमुळे बेरोजगार होता. हाताला काम नसल्याने घरात अन्नाचा एक कणही उरला नव्हता. अशा परिस्थितीतच या मुलावर चोरी केल्याचे आरोप लागले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.