आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bihar Dog Killing; Begusarai Dog Threat | Shooter Killed 15 Dogs | Dog Killing | Bihar News

बिहारमध्ये 15 कुत्र्यांचा एन्कांऊटर:कुत्र्याने चावा घेतल्याने एका महिलेचा मृत्यू, अनेक जण जखमी; भीतीपोटी ग्रामस्थ घराबाहेर पडेना

बेगुसरायएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
गावकऱ्यांच्या मदतीने शूटर्सने 15 कुत्र्यांना ठार केले.

बिहारच्या बेगुसरायमध्ये मंगळवारी सायंकाळी 15 कुत्र्यांना गोळ्या घालण्यात आल्या. हल्लेखोर कुत्र्यांमुळे गेल्या तीन दिवसात 6 जण गंभीर जखमी झाले. तर सोमवारी एका जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर पाटण्याहून शूटर्सची टीम पाठवण्यात आली. पथकाने गावकऱ्यांच्या मदतीने 15 कुत्र्यांची शिकार करून त्यांना ठार केले. याआधी 23 डिसेंबरला पाटण्यातील शूटर्सनी 12 कुत्रे मारले होते.

हल्ल्याच्या सर्वाधिक घटना बाचवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत. कुत्र्यांचा उपद्रव पाहून पुन्हा एकदा पाटणा येथील वन व पर्यावरण विभागाचे पथक मंगळवारी बचवडा येथे पोहोचले.

शूटर्स टीमने 4 पंचायतीअंतर्गत कारवाई केली

शूटर्सच्या टीमने 4 पंचायतीतील 15 कुत्र्यांना ठार केले. तर आज म्हणजे बुधवारी दिवसभर ही मोहीम सुरू राहणार आहे. कुत्र्यांच्या भीतीमुळे गावातील महिला- पुरूष घराबाहेर जात नव्हती.

बातम्या आणखी आहेत...