आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिहार विधानसभा निवडणूक:लोकशाहीच्या शक्तीपुढे फिकी पडली कोरोनाची धास्ती, कोरोनाच्या काळातही झाले वर्ष 2015 इतकेच मतदान

पाटणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनेक ईव्हीएम बंद, एका जागी राजद उमेदवाराच्या नावासमोर बटणच नव्हते

बिहारमध्ये कोरोनाची धास्ती लोकशाहीच्या शक्तीपुढे फिकी पडली. विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात बुधवारी ७१ जागांसाठी ५४.०१% मतदान झाले. ही टक्केवारी आणखी वाढू शकते. कारण, अनेक भागांतून रात्री उशिरापर्यंत माहिती आलेली नव्हती. २०१५ मध्ये या ७१ जागांसाठी ५४.७५% मतदान झाले होते. म्हणजेच कोरोनामुळे मतदान कमी होईल, हा तर्क येथे चुकीचा ठरला. निवडणूक आयाेगानुसार प्रारंभी अनेक मतदान कंेद्रांवर ईव्हीएम नादुरुस्त झाल्याची माहिती होती. मात्र, नंतर त्या बदलण्यात आल्या. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ३ तर राहुल गांधी यांनी राज्यात दोन जाहीर सभा घेतल्या.

राम मंदिराची तारीख विचारणारेच आता टाळ्या वाजवत आहेत ः मोदी

जे लोक आम्हाला राम मंदिर बांधकामाची तारीख विचारत होते, तेही आज नाइलाजाने टाळ्या वाजवत आहेत. सीतामातेच्या या भागात येऊन मी लोकांना राम मंदिराबद्दल शुभेच्छा देत आहे. -नरेंद्र मोदी, पंतप्रधान

रावणाऐवजी मोदी, अंबानी, अदानी यांचे पुतळे जळत आहेत : राहुल

मोदी चंपारणला आले होते तेव्हा साखर कारखाने सुरू करू, येथील साखरेचा चहा पिऊ,असे म्हणाले होते. सगळे खोटे निघाले. लोक रावणाऐवजी मोदी, अंबानी, अदानींचे पुतळे जाळत आहेत.-राहुल गांधी, काँग्रेसचे नेते

देशाच्या तुलनेत दुप्पट बेरोजगारी आणि स्थलांतरित मजुरांच्या समस्येमुळे रोजगार ठरला मुद्दा क्रमांक-१

बिहारमध्ये आता ३ नोव्हेंबरला होणाऱ्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानावर भर आहे. राष्ट्रीय परिप्रेक्ष्यात या निवडणुकीचे महत्त्व काय आणि कोण कोणत्या मुद्द्यावर भर देत आहे, हे पाहू...

> बिहार एवढे महत्त्वपूर्ण का आहे?

बिहार सर्वात मागास राज्यांपैकी एक आहे. पण १०.४ कोटी लोकसंख्येमुळे राजकीयदृष्ट्या हे एक महत्त्वाचे राज्य ठरले आहे. कोरोनानंतरची ही पहिली निवडणूक आहे. कोरोनाविरोधात मोदींची रणनीती जनता किती यशस्वी मानते हे या निवडणुकीवरून ठरणार आहे.

> कोणत्या मुद्द्यावर सर्वात जास्त भर?

बिहारमध्ये बेरोजगारी दर १०.२% आहे, तो देशाच्या सरासरीपेक्षा दुप्पट आहे. कोरोनामुळे मजूर गावी परतल्याने स्थिती आणखी खराब झाली. त्यामुळे विरोधकांनी बेरोजगारीलाच सर्वात मोठा मुद्दा बनवला आणि १० लाख सरकारी नोकऱ्यांचे आश्वासन दिले. प्रत्युत्तरात भाजपने १९ लाख रोजगारांचे आश्वासन दिले.

प्रत्यक्षातील स्थिती काय आहे?

बहुतांश प्री-पोल सर्व्हेत एनडीए पुढे असल्याचे दाखवले आहे. पण मागील बहुतांश प्री-पोल स‌र्व्हे खरे ठरले नाहीत. बिहारमधील सभांत बरोबरीची गर्दी जमा होत असल्याचे दिसत आहे.