आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Bihar Election 2020 Phase 1 Voting Live News Updates: Polling In 71 Seats Today, Test For JDU BJP RJD Congress

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिहारमध्ये 71 जागांसाठी मतदान:71 जागांवर 1 वाजेपर्यंत 33% मतदान; लखीसराय-भोजपुरमध्ये 3 हजारांपेक्षा जास्त लोकांनी मतदानावर टाकला बहिष्कार

पाटणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 952 पुरुष आणि 114 महिला रिंगणात, यातील 406 उमेदवार अपक्ष

कोरोनाच्या सावटाखाली बिहार विधानसभेसाठी 3 टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. आज पहिल्या टप्प्यात 71 जागांवर मतदान सुरू आहे. या ठिकाणी 1 हजार 66 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये 952 पुरुष आणि 114 महिला आहेत दुसऱ्या टप्प्यातील मतदान 3 नोव्हेंबर आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 नोव्हेंबर रोजी होणार आहे. निवडणुकीचा निकाल 10 नोव्हेंबर रोजी लागणार आहे.

बिहारमध्ये आज पहिल्या टप्प्यातील 71 जागांवर मतदान होत आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत 33% टक्के मदतान झाले. या 71 जागांवर 2015 मध्ये 55.11% आणि 2010 मध्ये 50.67% मतदान झाले होते.

दुसरीकडे लखीसरायच्या बालगुदर आणि भोजपुरच्या तरारीमध्ये 3 हजारांपेक्षा लोकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. येथील मतदार आपल्या परिसरात रस्ता आणि शाळा नसल्याने नाराज आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदानाची वेळ 1 तासाने वाढवली आहे. परंतु, वेगवेगळ्या जागांवर मतदानाचा कालावधी संपण्याची वेळ वेगळी आहे. 4 जागांवर सकाळी 7 ते 3 पर्यंत मतदान होणार आहे. तर 26 जागांवर संध्याकाळी 4 पर्यंत, 5 जागांवर 5 वाजेपर्यंत आणि इतर 36 जागांवर 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे.

अपडेट्स...

मतदान सुरू होण्याआधी औरंगाबादच्या बालूगंज येथे दोन IED सापडले. CRPF ने शोध मोहिमेदरम्यान हे IED निकामी केले. हा परिसर नक्षलग्रस्त आहे. याआधी मंगळवारी गयाच्या इमामगंजमध्ये दोन IED मिळाले होते. CRPF त्यांनाही निकामी केले होते.