आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bihar Election 2020 Result : JDU Losing Because Of Corona Pandemic Says JDU Leader KC Tyagi

बिहार निवडणूक:तेजस्वी यादवांमुळे नव्हे, तर कोरोनामुळे आमचा पराभव; जदयू नेत्याचे अजब तर्क

पाटणा9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनामुळे लोकांची नकारात्मक मानसिकता तयार झाली. त्यामुळे आमचा पराभव : जदयू नेते केसी त्यागी

बिहारमधील विधानसभा निवडणुकीचा निकालाच्या मतमोजणी सुरू आहे. आताच्या कलांनुसार राजद, भाजप आघाडीवर असून जदयू पिछाडीवर आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयूला मोठा धक्का दिला आहे. जेडीयूनेही हा पराभव मान्य केला असून मात्र तेजस्वी यादवांमुळे नव्हे तर कोरोनामुळे आमचा पराभव झालाय, असा दावा जदयूने केला आहे. त्यामुळे जदयूच्या या तर्कावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

जदयूचे नेते केसी त्यागी म्हणाले की, एका वर्षांपूर्वी राजदला लोकसभा निवडणुकीत एकही जागा मिळाली नव्हती. लोकसभा निवडणुकीनुसार जदयू आणि मित्रपक्षांना 200 पेक्षा अधिक जागा मिळणे अपेक्षित होते. नितीशकुमार नावाचा ब्रँड बिहारमधून गायब झालेला नाही आणि तेजस्वी यादवही नेते म्हणून इस्टॅब्लिश झालेले नाहीत. कोरोनामुळे लोकांची नकारात्मक मानसिकता तयार झाली. त्यामुळे आमचा पराभव झाला. राजदमुळे नाही, असे त्यागी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...