आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Bihar Election 2020 : Secession Begins In Bihar; In 70 Days, 12 Leaders Of Lalu's Party Go In JDU

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकारण:बिहारमध्ये पक्षांतर सुरू; 70 दिवसांत लालूंच्या पक्षाचे 12 नेते जदयूत, काँग्रेसप्रमाणे राष्ट्रीय जनता दलातही नेतृत्वाचा वाद

शीशभूषण | पाटणा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काँग्रेसमध्ये जुन्या व नव्या नेत्यांमध्ये सुरू असलेल्या कुरघोड्या बिहारमध्ये राजदमध्येही दिसताहेत

बिहारमध्ये निवडणुकीची धामधूम सुरू आहे. येथील प्रमुख पक्ष राजदमध्ये जोरदार हालचाली दिसून आल्या. रंजक बाब म्हणजे काँग्रेसमध्ये जुन्या व नव्या नेत्यांमध्ये सुरू असलेल्या कुरघोड्या बिहारमध्ये राजदमध्येही दिसून येत आहेत.

काँग्रेसमधील रस्सीखेच, पक्ष विरुद्ध घराण्यावरील निष्ठा आणि राहुल -सोनिया गट पडलेले दिसून येत आहेत. राजदमध्येही जवळपास हेच चित्र दिसून येत आहे. येथेही लालू युग आणि तेजस्वी युगाचे अंतर वाढत चालले आहे. गेल्या ७० दिवसांत राजद सोडून १२ आमदार जदयूमध्ये गेले आहेत. लालूंच्या नेतृत्वाखाली ज्यांनी राजकीय कारकीर्द गाजवली अशा नेत्यांचा पक्ष सोडणाऱ्यांत समावेश आहे. त्यांचे तेजस्वीशी सूत जुळू शकले नाही. काहींना अहंकार नडला तर काहींनी तिकिटासाठी पक्षांतर केले.

वास्तविक पाहता राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव डिसेंबर २०१७ पासून सतत तुरुंगात आहेत. या काळात राजदच्या जुन्या नेत्यांच्या तेजस्वीशी गाठीभेटी कमी झाल्या होत्या. पक्षाचा एखादा कार्यक्रम असो वा विधानसभेचे अधिवेशन, या दोन्ही काळातच तेजस्वींची त्यांची भेट हाेत असे. या भेटीतही जुने नेते लालूसोबत जितक्या मोकळेपणाने आपले म्हणणे मांडत असत, तेवढा मोकळेपणा तेजस्वीशी बोलताना त्यांना वाटत नव्हता. शिवाय वयाचे अंतरही यात आडवे आले. या अवधीत तेजस्वीने नव्या तरुण नेत्यांचा एक गट तयार केला. जुने नेते तेजस्वीला टाळू लागले. त्यांच्या भेटीतही लालूप्रसाद यांचा उल्लेख सतत होत असे. या ज्येष्ठ नेत्यांना लालूंच्या काळात मिळत होता तोच आदर-सन्मान तेजस्वीकडूनही मिळण्याची अपेक्षा होती.

राजद सोडणाऱ्या आमदारांच्या प्रतिक्रिया

> जयवर्धन यादव - राजदमध्ये राजकीय वजन असलेल्या नेत्यांचा छळ केला जातो. लालू-राबडी शासनातील १५ वर्षे पाटण्यातील एकमेव नेते बृजनंदन यादव यांना मंत्री केले. आता राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या पैसेवाल्या लोकांची चलती आहे.

> महेश्वर यादव - राजदमध्ये गरिबांचे फक्त नाव व भांडवलदारांना मान आहे. एकाच घराण्याचा पक्ष आहे. गरीब, मजुरांना तेथे स्थान नाही.

> कमरे आलम - राजदसोबत आता आमचे सख्य राहणार नाही, असे वाटत आहे. त्यामुळे आम्ही वेगळा मार्ग निवडला. काही फालतू वादास येथे अर्थ नाही.