आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिहार निवडणूक:जास्त जागा न मिळाल्यास चिराग यांची रालाेआ सोडण्याची तयारी, जागा वाटपावरून लाेजपाशी पेच, भाजप नेते दिल्लीहून पाटण्याला

नवी दिल्ली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र बिहारच्या मुजफ्फरपूरच्या रेपुरा गावातील आहे. उमेदवार या गावात जाण्यासाठी घाबरू लागले आहेत. - Divya Marathi
छायाचित्र बिहारच्या मुजफ्फरपूरच्या रेपुरा गावातील आहे. उमेदवार या गावात जाण्यासाठी घाबरू लागले आहेत.
  • दिल्ली : नड्डांच्या घरी पाेहाेचले शहा, बैठकीत चिरागदेखील सहभागी

बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्याची तयारी सुरू झाली आहे. दाेन्ही आघाड्यांत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. रालाेआमध्ये लाेजपाचा पेच आहे. लाेजपाचे अध्यक्ष चिराग पासवान अजून नरम पडलेले दिसत नाहीत. काेणत्याही प्रकारच्या दबावासमाेर झुकणार नसल्याचे स्पष्ट केले. सूत्रांच्या म्हणण्यानुसार लाेजपाला रालाेआमध्ये ३६ जागांची आॅफर आहे. परंतु चिराग यांना ४२ जागा हव्या आहेत. त्याबाबत चिराग तडजाेडीला तयार नाहीत. विधानसभेच्या जागांबराेबरच विधान परिषदेच्या दाेन आणि राज्यसभेची एक जागा देण्याचाही विचार आहे. एवढे असूनही चिराग म्हणाले, लाेजपाला ४२ जागा दिल्या नाही तर पक्ष १४३ जागी रिंगणात उतरेल, असा पवित्रा त्यांनी घेतल्याने पेच वाढला आहे. २०१५ च्या निवडणुकीत लाेजपा ४२ जागी निवडणूक लढली हाेती. मात्र लाेजपाच्या सहापैकी चार खासदारांनी चिराग यांच्या मतांशी असहमती दर्शवली आहे. त्यात खासदार पशुपतीकुमार पारस हे प्रमुख खासदार आहेत. पारस म्हणाले, रालाेआची मते व पंतप्रधान माेदी यांचा प्रभाव यामुळे आम्ही खासदार म्हणून निवडून आलाे.

दिल्ली : नड्डांच्या घरी पाेहाेचले शहा, बैठकीत चिरागदेखील सहभागी
बिहारमध्ये जागावाटपाबाबत दिल्लीत भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी बैठक झाली. त्यात गृहमंत्री अमित शहा यांची उपस्थिती हाेती. या बैठकीत चिरागदेखील सहभागी झाले. सूत्रांच्या म्हणण्यानुसार शहा यांनी जागावाटपातील तिढा साठवण्यासाठी प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी फडणवीस यांना नितीश यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाटण्याला पाठवले. चिराग दाेन दिवसांपासून अमित शहा यांच्या भेटीची प्रतीक्षा करत हाेते.

पाटणा : दिल्लीहून आली भाजपची टीम, जागांबाबत तीन दिवसांत निर्णय
भाजप नेत्यांनी दिल्लीनंतर आता गुरुवारी पाटण्यात दाेन बैठका घेतल्या. त्यात बिहारचे भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव आणि निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस सहभागी झाले. भाजपचे बिहार प्रभारी भूपेंद्र यादव म्हणाले, रालाेआ एकजूट आहे. जदयू, भाजप, लाेजपा मिळून निवडणूक लढवली जाईल. जागावाटपाबाबत दाेन-तीन दिवसांत निर्णय घेतला जाईल. आम्ही लवकरच निर्णय घेऊ. फडणवीस व भूपेंद्र जदयू अध्यक्ष व मुख्यमंत्री नितीशकुमार यांची भेट घेणार आहेत.

सरकारी कर्मचाऱ्यांना ठेवले ९ तास आेलीस...
मुजफ्फरपूर । छायाचित्र बिहारच्या मुजफ्फरपूरच्या रेपुरा गावातील आहे. उमेदवार या गावात जाण्यासाठी घाबरू लागले आहेत. कारण गावकरी त्यांना पाच वर्षांचा िहशेब मागू लागले आहेत. गावकरी लाेकप्रतिनिधीच नव्हे तर सरकारी कर्मचाऱ्यांवरदेखील नाराज आहेत. जनावरांच्या लसीकरणासाठी पशुपालन विभागातील कर्मचारी गावात पाेहाेचले तेव्हा ग्रामस्थांनी त्यांना ९ तास आेलीस ठेवले हाेते.

बातम्या आणखी आहेत...