आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • National
 • Bihar Election Chunav News: BJP Manifesto Announcement News Updates For Bihar Assembly Elections 2020

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिहारमध्ये भाजपचा जाहीरनामा:19 लाख लोकांना रोजगार देण्याचे वचन, सत्ता आल्यास बिहारमधील प्रत्येक नागरिकाला मोफत कोरोना व्हॅक्सिन देण्याचे भाजपचे आश्वासन

एका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • जाहिरनाम्यात लालू-राबडी यांच्या 15 वर्षांनंतर आणि नीतीश यांच्या 15 वर्षांनंतर बिहारच्या 11 वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आलेल्या बदलांची तुलना करण्यात आली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकांविषयी भाजपाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. 'आत्मनिर्भर बिहार का रोडमॅप' या जाहिरनाम्यामध्ये एक लक्ष्य, 5 सूत्र आणि 11 संकल्पांचा उल्लेख आहे. 19 लाख लोकांना रोजगार देणे आणि बिहारमधील नागरिकांना फ्री कोरोना व्हॅक्सिनेशन दिली जाणार असल्याचे आश्वासन भाजपकडून देण्यात आले आहे.

जाहिरनाम्यात लालू-राबडी यांच्या 15 वर्षांनंतर आणि नीतीश यांच्या 15 वर्षांनंतर बिहारच्या 11 वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आलेल्या बदलांची तुलना करण्यात आली आहे. जाहिरनामा प्रसिद्ध करत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटले की, लालू-राबडी यांच्या 15 वर्षांच्या औद्योगिक उत्पादनाचा कोणताही डेटा मिळालेला नाही, यामुळे आम्ही घोषणापत्रात याची जागा रिकामी ठेवली आहे. आमच्या 15 वर्षांच्या शासनात औद्योगिक विकासात 17% ची वाढ झाली आहे.

एक लक्ष्य : आत्मनिर्भर बिहार
5 सूत्र

 1. स्वस्थ समाज, आत्मनिर्भर बिहार
 2. शिक्षित बिहार, आत्मनिर्भर बिहार
 3. गांव-शहर, सबका विकास
 4. सशक्त कृषि, समृद्ध किसान
 5. उद्योग आधार, सबल समाज

11 संकल्प

 1. बिहारच्या प्रत्येक नागरिकाला मोफत कोरोना लस दिली जाईल.
 2. मेडिकल, इंजीनियरिंगसह तांत्रिक शिक्षण आता हिंदीमध्येही उपलब्ध करु.
 3. 3 लाख शिक्षकांची नियुक्ती करु
 4. आयटी हबच्या रुपात विकसित करुन 5 वर्षात 5 लाख रोजगार उपलब्ध करु
 5. एक कोटी महिलांना स्वावलंबी बनवू
 6. एकूण 1 लाख लोकांना आरोग्य विभागात नोकरी देऊ, अखिल भारतीय आरोग्य संस्थान एम्सचे संचालन 2024 पर्यंत सुनिश्चित करु.
 7. धान आणि गहूनंतर आता डाळदेखील एसएमपीच्या निश्चित दराने खरेदी केल्या जातील.
 8. ग्रामिण क्षेत्र तसेच शहरी क्षेत्रांच्या आणि 30 लाख लोकांना 2022 पर्यंत पक्की घरे देऊ
 9. 2 वर्षांमध्ये खासजी आणि कॉम्फेड आधारित 15 नवीन प्रोसेसिंग उद्योक आणू
 10. पुढच्या 2 वर्षांमध्ये गोड पाण्यात पालण्यात येणाऱ्या माश्यांच्या उत्पादनात राज्याला देशात नंबर एक राज्य बनवू.
 11. बिहारचे 10 हजार नवीन शेतकरी उत्पादन संघांना आपसात जोडून राज्यभरातील विशेष पीक उत्पादन म्हणजेच, मक्का, फळे, चूडा, मखाना, पान, मसाला, मेंथा, औषधीय रोपांची सप्लाय चेन विकसित करु. प्रदेशात यामुळे 10 लाख लोकांना रोजगार मिळेल.

15 वर्षे VS 15 वर्षे
जाहिरनाम्यामध्ये 15 वर्षे विरुद्ध 15 वर्षे याचा उल्लेख केला आहे. शिक्षण क्षेत्रात राज्य सरकारमध्ये काय करण्यात आले, यानंतर नीतीश सरकारने काय उपलब्ध केले हे दाखवण्यात आले. तांत्रिक शिक्षणात 15 वर्षांच्या राजद शासनामध्ये काय स्थिती होती आणि आता शासनात काय स्थिती आहे. भाजपने हे देखील सांगितले की, लालू-राबड़ी यांच्या 15 वर्षात प्रति व्यक्तीची उत्पन्न 8 हजार होते, जी भाजप-जदयूच्या यूती सरकारमध्ये वाढून 43 हजारांपेक्षा जास्त झाली.