आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Bihar Election Effect : Kapil Sibal Critique On The Congress Leadership In Performance Of Bihar Assembly Polls

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिहारच्या निकालावरून काँग्रेसमध्ये फूट:कपिल सिब्बल यांचा सोनिया-राहुल गांधींवर निशाणा; म्हणाले - लीडरशिपला बहुतेक सर्वकाही ठीक वाटत आहे

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुजरात पोटनिवडणुकीत काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही , सिब्बल यांनी व्यक्त केली खंत

कपिल सिब्बल यांनी काँग्रेसच्या बिहार निवडणुकीतील खराब कामगिरीवर पक्षातील नेतृत्वावर निशाणा साधला आहे. सिब्बल म्हणाले की, काँग्रेसने प्रत्येक निवडणुकीत पराभव हा पक्षाचे नशिब म्हणून स्वीकारला आहे. सिब्बल यांनी इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, "बिहार निवडणूक आणि इतर राज्यांच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या कामगिरीबाबत वरील नेतृत्त्वाचे मत अद्याप समोर आले नाही. कदाचित त्यांना सर्वकाही ठीक वाटत असेल आणि ही एक सामान्य बाब मानली जात आहे."

लोक कदाचित काँग्रेसला प्रभावी मानत नाहीत

सिब्बल म्हणाले की, बिहार आणि पोटनिवडणुकांच्या निकालावरून असे वाटत आहे की, देशातील जनता काँग्रेसला एक प्रभावी पर्याय मानत नाही. बिहारमध्ये राजद पर्याय आहे. गुजरात पोटनिवडणुकांत काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. लोकसभा निवडणुकीतही हीच परिस्थिती होती. उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकांत काही जागांवर काँग्रेस उमेदवारांना 2% पेक्षा कमी मते मिळाली आहेत. गुजरातमध्ये काँग्रेसच्या 3 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...