आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bihar Election Result 2020 Latest Update; Bankipore Seat Pushpam Priya Chaidhary( The Plurals) Vs Luv Sinha (congress) Vs Nitin Navin (nda)

सेल्फ प्रोजेक्टेड सीएम:स्वयंघोषित मुख्यमंत्री पुष्पम प्रिया चौधरी यांना बिस्फीमध्ये फक्त 309 मतं

पाटणा9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे आणि सर्वांचे लक्ष्य 'द प्लुरल्स पार्टी'च्या पुष्पम प्रिया चौधरी यांच्यावर आहे. स्वतःला मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार म्हणवणाऱ्या प्लुरल्स पार्टीच्या पुष्पम निवडणुकीतून बाहेर जाताना दिसत आहे. निवडणूक आयोगाद्वारे जारी आकडेवारीनुसार, दुपारी 2:30 वाजेपर्यंत पुष्पम यांना बिस्फीमध्ये फक्त 309 मत मिळाले आहेत, तर बांकीपूरमध्ये 751 मित मिळाले आहेत. बिस्फीमध्ये राजदचे फैयाज अहमद 28,968 मतांसह खूपप पुढे आहेत. तर, बांकीपूरमध्ये नितीन नवीनदेखील 12,757 मतांसह पुढे आहेत. दुसरीकडे, याच जागेवरुन निवडणूक लढत असलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा लव्ह सिन्हा यांना फक्त 3,853 मत मिळाले आहेत.

वृत्तपत्रात जाहिरात देऊन प्रकाश झोतात आलेली पुष्पम प्रिया यांनी स्वतःला मुख्यमंत्री पदाची उमेदवार घोषित केले होते. त्या सोशल साइटवरही खूप अॅक्टीव्ह असतात. या निवडणुकीतून त्या आपले राजकीय नशीब आजमावत आहेत. मुळ दरभंगाच्या रहिवासी असलेल्या पुष्पम यांनी लंडनच्या स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर्स डिग्री घेतली आहे.

बिस्फीमध्ये पुष्पम यांना फक्त 309 मते

मधुबनी जिल्ह्यातील बिस्फी विधानसभा क्षेत्रात पुष्पम यांना फक्त 309 मते मिळाले. येथून राजदच्या फैयाज अहमद 28,968 मतांसह खूप पुढे आहेत. येथून राजदच्या फैयाज अहमद आणि भाजपच्या हरिभूषण ठाकुर यांच्यात कडवी टक्कर आहे. 2015 च्या निवडणुकीत फैयाज अहमद सलग दुसऱ्यांना विजयी झाले होते. त्यामुळे, यंदाही त्यांचे पारडे मजबूत मानले जात आहे.

बांकीपूरमधून नितीन नवीन पुढे

पाटण्यातील हाय प्रोफाइल सीट बांकीपूरवर नितीन नवीन 12,757 मतांसह पुढे आहेत. यानंतर लव्ह सिन्हा 3,853 मतांसह दुसऱ्या नंबरवर आहेत. पुष्पम प्रिया चौधरी यांना येथे फक्त 751 मते मिळाली.

बातम्या आणखी आहेत...