आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बिहार निवडणुकीत NDA बहुमताच्या दिशेने पुढे जात आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 4.10 कोटींपेकी 2.56 कोटी, म्हणजेच 62% मत मोजणी पूर्ण झाली आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत NDA 133 ठिकाणी पुढे होती, पण संध्याकाळी 5 पर्यंत जागा कमी होऊन 123 वर आला.
तिकडे राजदही सत्ता स्थापनेचा दावा करत आहे. कारण, 18 जागांवर एक हजारापेक्षा कमी फरकाने मतमोजणी सुरू आहे. यातील 9 वर NDA आणि 8 वर महाआघाडी पुढे आहे. 1 सीटवर बसपा पुढे आहे.
दुसरीकडे प्लूरल्स पक्षाच्या पुष्पम चौधरी यांनी ईव्हीएम हॅकिंगचा आरोप केला आहे.पुष्पम प्रिया चौधरी यांनी दुपारी 2 वाजता फेसबुकवर लिहिले की, बिहारमध्ये ईव्हीएम हॅक झाले आहे. प्लूरल्सची मते चोरून प्रत्येक बुथवर एनडीएला वर्ग होत आहेत. आम्हाला तर बहुमत नव्हते, पण एनडीएलाही बहुमत मिळणार नव्हते. प्लूरल्सच्या मत चोरीने त्यांना बहुमत मिळत आहे.
गजब बिहार, एका तासात दोन सरकार
तत्पूर्वी मंगळवारी सकाळी कल येऊ लागले, तेव्हा बिहारच्या खुर्चीची शर्यत आणखी रंजक बनली. अगदी सुरुवातीपासूनच महाआघाडी आघाडीवर होती. सकाळी 9 वाजेपर्यंत इतकी आघाडी घेतली होती की, त्यांचे सरकार बनेल असे वाटत होते. मात्र एका तासानंतर संपूर्ण चित्र पालटले आणि नितीश कुमार यांनी बाजी पलटली. एनडीए 120 च्या जवळ पोहोचताना दिसली. पुढील अर्ध्या तासात एनडीएने बहुमताचा आकडा पार केला. दरम्यान सध्या फक्त भास्करचा एक्झिट पोल खरा ठरताना दिसत आहे. ज्यामध्ये एनडीएला 120 ते 127 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता.
कलांनुसारचे अपडेट्स
तीन टप्प्यांत झालेल्या निवडणुकीत 7.34 कोटी मतदारांपैकी 57.05% लोकांनी मतदान केले. 2015 मध्ये 56.66% मतदान झाले होते. यावेळी 3,733 उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी 3,362 पुरुष, 370 महिला आणि 1 ट्रान्सजेंडर आहे.
निवडणूक प्रचारातील 4 मोठे चेहरे
नितीश कुमार : नितीश कुमार स्वतः मैदानात नव्हते, मात्र ते जदयूचा सर्वात मोठा चेहरा होते. त्यांनी 103 मतदारसंघात 113 सभा घेतल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी : मोदी काळातील ही पहिलीच निवडणूक होती, ज्यामध्ये अमित शाह गैरहजर होते. मोदीच प्रचाराचा सर्वात मोठा चेहरा होते. त्यांनी यादरम्यान बिहारमध्ये 12 सभा घेतल्या.
तेजस्वी यादव : महाआघाडीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत. तेजस्वी यांनी 21 दिवसांत 251 सभा घेतल्या. त्यांनी दररोज सरासरी 12 सभा घेतल्या. यासोबतच त्यांनी 4 रोड शो देखील केले.
राहुल गांधी : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती ठीक नसल्याने त्या प्रचारापासून लांब राहिल्या. यावेळी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका वढेरा देखील दिसल्या नाहीत. काँग्रेससाठी राहुल यांनीच प्रचाराचा मोर्चा सांभाळला. त्यांनी एकूण 8 सभा घेतल्या.
महाआघाडीने 122 जागा जिंकल्यास 31 वर्षांचे तेजस्वी सीएम होतील. ते एखाद्या मोठ्या राज्याचे आजवरचे सर्वात तरुण सीएम असतील. एम.ओ. हसन फारूक 30 वर्षांंचे असताना पुद्दुचेरीचे सीएम बनले होते. तेजस्वी आयपीएलमध्ये दिल्लीच्या संघात होते. मात्र त्यांना खेळण्याची संधी मिळाली नाही.
एक्झिट पोल अचूक ठरल्यास वडिलांप्रमाणे सीएम ठरणाऱ्या नेत्यांमध्ये तेजस्वी यादव यांचाही समावेश होईल. तथापि, नितीशकुमार जर सरकार टिकवण्यात यशस्वी ठरल्यास ते सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनणारे पहिलेच नेते असतील.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.