आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेला टोला:'भाजप शब्दाचे पक्के आहे, येथे मोदींनी सांगितल्याप्रमाणे नितीश कुमारच मुख्यमंत्री होणार', देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला टोला

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्रामध्ये मोदींनी उद्धव ठाकरेंसमोर त्यांच्या संमतीने भाजपचा मुख्यमंत्री होणार अशी घोषणा होती.

बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला विजय मिळाला आहे. येथील प्रचाराची जबाबदारी माजी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्यावर होती. आता देवेंद्र फडणवीस बिहार निवडणुकांच्या निकालावर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी नितीश कुमारच बिहारचे मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगितले आहे. यासोबतच भाजपा दिलेला शब्द पाळते असे सांगत शिवसेनेला टोला लगावला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी याविषयावर भाष्य केले आहे.

बिहारमध्ये भाजपला जास्त जागा मिळाल्या असल्या तरीही ठरल्या प्रमाणे नितीश कुमारच मुख्यमंत्री होणार असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत. याविषयावर बोलताना ते म्हणआले की, 'मुख्यमंत्री जेडीयूचा होईल आणि ते नितीश कुमार असणार हे आधीच ठरलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच तशी घोषणा केली आहे. त्याच्यामुळे त्याच्यात बदल होणार नाही. भाजपा शब्दाचे पक्के आहे. महाराष्ट्रामध्ये मोदींनी उद्धव ठाकरेंसमोर त्यांच्या संमतीने भाजपचा मुख्यमंत्री होणार अशी घोषणा होती. आम्ही त्यावर अडून राहिलो होतो. मात्र येथे मोदींनी जदयूचा मुख्यमंत्री होईल अशी भूमिका घेतली आहे ती आम्हाला मान्य आहे. आम्ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वात काम करणार असल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले आहे. तसेच भाजप शब्दाचे पक्के असल्याचे म्हणत शिवसेनेला टोला लगावला आहे.

बातम्या आणखी आहेत...