आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bihar Election Results: BJP: Gujarat UP Madhya Pradesh Vidhan Sabha Chunav Praninam 2020 Latest News Today Updates; Vijay Rupani, Shivraj Singh Chouhan, BJP Party MLA Candidate

पोटनिवडणुकांमध्ये भाजप आघाडीवर:गुजरातमध्ये राज्यसभा निवडणुकांमध्ये भाजपला साथ देणारे काँग्रेसचे बंडखोर आमदार आघाडीवर

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुजरातमध्ये 8 जागांमधून 7 वर भाजप आघाडीवर 1 वर काँग्रेस
  • झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांचे रिकाम्या झालेल्या जागेवर भाजप आघाडीवर
  • कर्नाटकात कांग्रेस-JD (s) च्या जागेवर ताबा मिळवताना दिसत आहे भाजप

बिहारच्या विधानसभा निवडणुकांसोबतच मंगळवारी 11 राज्यांच्या 56 विधानसभा बिहारच्या वाक्मीकिनगर लोकसभा सीटवर झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपने मोठे यश मिळवले आहे. मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान यांचे मुख्यमंत्री पद हे पक्के झाले आहे. तर गुजरातमध्ये भाजपने आपली स्थिती आणखीच मजबूत केली आहे.

बिहारसोबतच पोट निवडणुकांमध्ये केंद्राच्या नरेंद्र मोदी सरकारने दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या वर्षांची धोरणे आणि कामांना जनमताचे संग्रह म्हणून पाहिले जाऊ शकते. कोरोना व्हायरस महामारी रोखण्यासाठी लावण्यात आलेले लॉकडाऊन, बेरोजगारी, ढासळत असलेल्या अर्थव्यवस्थेसोबतच नवीन शेतकरी कायदा आणइ चीनी सैन्य लडाखमध्ये शिरकावर करत असलेल्या मुद्द्यांवर जनतेचे मत समोर येत आहे. या दरम्यान जम्मू-कश्मीरमधून कलम 370 हटवणे, तेथील जमीन विकत घेण्याचा अधिकार भारतीयांना दिणे, राम मंदिराचे भूमिपूजन असे काही मुद्दे आहेत, ज्यावर मतदारांनी मोहोर लावली आहे.

बिहारच्या लोकसभा सीटवर जेडी(यू) आघाडीवर
जेडी(यू) खासदार बैद्यानाथ प्रसाद महतो यांचे फेब्रुवारीमध्ये निधन झाल्यानंतर वाल्मीकिनगर लोकसभआ सीटवर पोटनिवडणूक झाली होती. यावर जेडी(यू)चे उमेदवार सुनील कुमार सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडीवर आहेत.

गुजरातच्या 8 मधून 7 जागांवर भाजप आघाडीवर आहे
गुजरात पोटनिवडणुकांच्या सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप 8 मधून 7 जागांवर पुढे आहे. एका जागेवर काँग्रेस पुढे आहे. गुजरातमध्ये 8 जागांवर पोट निवडणुका आवश्यक झाल्या होत्या. कारण जूनमध्ये राज्यसभा निवडणुकांच्या बरोबर पहिले काँग्रेसच्या 8 आमदारांनी राजीनामा दिला होता.

काँग्रेसने 1995 नंतर आपले बेस्ट परफॉर्मेंस देत 2017 मध्ये 77 सीट जिंकले होते. आता त्यांना वाटते की, सर्व 8 जागा त्यांच्या झोळीत याव्यात. भाजपच्या राज्यसभा सीट कायम राखण्यासाठी ज्या 8 आमदारांनी काँग्रेसला रामराम ठोकला होता. त्यामधील 5 जणांना भाजपने तिकीट दिले आहे. गुजरातमध्ये पोट निवडणुकांचे निकाल सरकारवर सरळ परीणाम करणार नाही. कारण तेथे भाजपजवळ 182 सदस्यांच्या सदनामध्ये 103 वोट आहेत. तर काँग्रेस जवळ केवळ 65 सीट आहेत. गुजरातमध्ये स्थानिक जागांवर निवडणुकाही होणार आहेत, यामुळे पोट निवडणुकांमध्ये वोटर्सचा मूड समजणे महत्त्वाचे ठरणार आहे.

उत्तरप्रदेश (7 जागा) : योगींचा प्रभाव झाला कमी
2017 मध्ये जेव्हा भाजपने एकतर्फी विजय मिळवला होता तेव्हा अनेक दशकांनंतर या 7 मधून 6 जागांवर विजय मिळवला होता. एक सीटवर SP चा आमदार होता. पोट निवडणुकांच्या सुरुवातीच्या कलांनुसार 7 मधून 5 जागांवर भाजप आघाडीवर आहे. या सात सीटवर कायदा-व्यवस्था, विशेषतः महिला सुरक्षा, दुष्कर्म आणि जाती-आधारित संघर्ष पाहता योगी आदित्यनाथ सरकारची मोठी परीक्षा आहे. एका सीटवर अपक्ष आणि एका सीटवर सपा आघाडीवर आहे.

कर्नाटमध्ये भाजपला दोन सीटचा फायदा
कर्नाटक, झारखंड, नागालँड, मणिपूरमध्ये 2-2 जागांवर पोटनिवडणुका होत आहे. कर्नाटकात दोन जागांवर काँग्रेस आणि JD(S) ची ताकद होती. यानंतरही दोन्ही जागांवर भाजप आघाडीवर आहे. अशा प्रकारे बीएस येदियुरप्पा सरकारला मजबूती मिळत आहे.

झारखंडमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरोन यांनी दुमका सीट सोडले होते. तर काँग्रेसच्या एका आमदाराचा मृत्यू झाला होता. दुमकामध्ये भाजप आघाडीवर आहे. ज्यामुळे मुख्यमंत्र्यांची स्थिती कमकुवत होत असल्याचे दिसत आहे. तर दुसऱ्या सीटवर काँग्रेस आघाडीवर आहे.

नागालँडमध्ये 3 आमदारांचे निधन झाल्यावर पोटनिवडणुका आवश्यक होत्या आणि दोन्हीही ठिकाणी अपक्ष उमेदवार पुढे आहेत. मणिपुरमध्ये 2 जागांवर भाजपच्या झोळीमध्ये येत असल्याचे दिसत आहे.

ओडिशामध्ये ज्या 2 जागांवर पोटनिवडणुका होत होत्या, तिथे भाजप आणि बीजद जवळ एक-एक सीट होते. सुरुवातीच्या कौलांनुसार दोन्ही सीट BJD ला जात असल्याचे दिसत आहे. दोन्हीही पक्षांनी माजी आमदारांच्या मुलांना तिकिट दिले आहे. कारण सहानुभुतीवर त्यांना मते मिळू शकतील.

तेलंगानामध्ये भाजप, हरियाणामध्ये काँग्रेस
तेलंगानाच्या एका जागेवर भाजप आघाडीवर आहे. हे सीट TRS आमदाराच्या निधनानंतर रिकामे झाले होते. हरियाणामध्ये जाट बहुर सीट काँग्रेसच्या ताब्यत राहिले आहेत. येथे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना भाजपसाठी संधी दिसत आहे, मात्र काँग्रेस येथे आघाडीवर आहे. छत्तीसगढमध्ये अजित जोगी यांच्या निधनाने रिकामी झालेल्या मरवाही सीटवर दोन दशकांपासून त्यांच्या कुटुंबाचा ताबा राहिला आहे. या सीटवर काँग्रेस आघाडीवर आहे.

बातम्या आणखी आहेत...