आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बिहार निवडणूक:काेराेना काळात ‘डिस्टन्सिंग’ राखणाऱ्या नेत्यांना जनता ‘आयसाेलेट’ करेल, अन्यथा ‘सॅनिटाइझ’ करून वापरेल

पाटणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
शेखर सुमन
  • पाच वर्षे गळ्यात हार घालून मिरवणारे लिहिताहेत ‘चाैपाई’

सध्या बिहारमधील सगळी नेतेमंडळी निवडणुकीच्या नावेत बसलेली आहे. परंतु, विचार केल्यास या परिस्थितीत बिहारच्या जनतेला निवडणुकीपेक्षा बाेटींचीच जास्त गरज आहे, असे म्हणावे लागेल. पण, आपले सर्वकाही गमावून बसलेल्या जनतेला यंदा मत देण्यासाठी तरी बाेटीने वाचवले जाईल. असाे. बिहारमधील हा पराभव जनतेचाच पराभव आहे. मात्र, जनतेच्या पराभवाशी बिहारच्या नेत्यांना देणे-घेणे नाही. कारण ताेपर्यंत ते ५ वर्षे गळ्यात हार घालून फिरण्याच्या तयारीला लागलेले असतील. एवढेच नव्हे सगळेच नेते आता आश्वासनांची चाैपाई लिहिण्यात व्यग्र आहेत.

निवडणुकीची चाैपाई लिहिण्यामागेही एक कारण असते. ते म्हणजे अशा नेत्यांची हादरलेली ‘चारपाई’. खरे तर त्याच खाटेवर पाच वर्षे पडल्यापडल्या ते पंचवार्षिक याेजनाही लागू करून टाकतात. आता निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. मग त्यांची खाट पुन्हा उभी करण्यात आली आहे. म्हणून ही नेतेमंडळी जनतेच्या चरणी आली आहे. निवडणुकीतील सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर ते जनतेच्या चरणकमलांपासून काेसाेमैल दूर निघून जातील.

दुसरीकडे जनतेची कामे मंदगतीने करणारे व नावाला तेज असलेले तेजप्रताप घराेघर जाऊन पदार्थांचा आस्वाद घेताहेत. चला, एक चांगले झाले. काय खावे आणि काय नकाे, हे त्यांना वडिलांकडून शिकायला मिळाले. असाे. लालू यादव यांचे दाेन पुत्र तेजस्वी व तेजप्रताप यंदा बिहारमध्ये पुन्हा आपले अस्तित्व शाेधू लागले आहेत. आता लालू यादव यांचे हे दाेन कुलदीपक काय दिवे लावतात, हे पाहणे रंजक ठरेल. तसे बिहारमध्ये हे दाेन कुलदीपक नव्हे तर एक ‘चिराग’ देखील आहे.

आश्वासनांची पूर्तता नसल्याने नव्यांचा विचार का?
निवडणूक जवळ येईल तसा नेत्यांचा प्रचारही तापू लागेल. आश्वासने व दाव्यांचा पिटारा उघडेल. परंतु, गेल्यावेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता नसल्यामुळे नव्या गाेष्टींचा विचार करण्याची गरज नाही. हेच त्यांच्या साेयीचे ठरेल. काेराेनाच्या काळात बिहारच्या आमदारांनी आपल्या विधानसभा क्षेत्रातील लाेकांची खूप काळजी घेतली आहे. त्यांनी संपूर्ण क्षेत्राशी एक डिस्टन्सिंग ठेवली आहे. बहुतांश आमदार आपल्या भागातील जनतेला भेटले देखील नाहीत. याला म्हणतात खऱ्या अर्थाने फिजिकल डिस्टन्सिंग. म्हणूनच बिहारच्या जनतेने देखील अशा नेत्यांशी डिस्टन्सिंग राखावे, असे मला वाटते. जनता काेणाला सॅनिटाइझ करून वापरते आणि काेणत्या नेत्याला पाच वर्षे मास्क घालून राहावे लागेल, हे याेग्य वेळ आल्यावर दिसेल.