आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Bihar Election Update; Onions And Potatoes Thrown At Chief Minister Nitish Kumar During Rally In Harlakhi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिहार निवडणूक:बिहारच्या मुख्यमंत्र्यांवर जनतेचा रोष; भरसभेत नितीश कुमारांवर फेकले कांदे-बटाटे

पाटणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विधानसभेच्या तिसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी बिहारमध्ये प्रचार शिगेला पोहचला आहे. सर्वच पक्षातील नेते प्रचारात सामील होऊन मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. पण, यादरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भरसभेत लोकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले आहे. नीतीश कुमार मंगळवारी मधुबनी जिल्ह्यातील हरलाखी विधानसभा क्षेत्रात प्रचारासाठी गेले असता, भर सभेत त्यांच्यावर कांदे-बटाटे फेकण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. परंतू, यातील एकही कांदा-बटाटा नितीश कुमारांपर्यंत पोहचला नाही.

मुख्यमंत्र्यांवर कांदा-बटाटा फेकताना त्या व्यक्तीने बिहारमध्ये बिंधास्तपणे मद्यविक्री होत असून, सरकार काहीच करत नसल्याचा आरोप केला. यावेळी नितीश कुमारांच्या सुरक्षा रक्षकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. पण, फेकू द्या, जेवढे कांदे-बटाटे फेकायचे आहेत तेवढे फेकू द्या, असे नितीश कुमार म्हणाले. यानंतर त्यांनी आपले भाषण सुरुच ठेवले.