आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bihar Exit Poll Results 2020 JDU RJD LJP Updates : Bihar Assembly Election Exit Polls Latest News

बिहार एक्झिट पोल:महाआघाडीची सरशी; नितीश यांची एक्झिट? बिहारमध्ये तिसऱ्या टप्प्यात 78 जागांवर 57.91% मतदान

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिहारमध्ये 2010 ला पोल अचूक ठरले , पण 2015 मध्ये एकही नाही

बिहारमध्ये शनिवारी सायंकाळी मतदान पूर्ण होताच एक्झिट पाेलचे कल हाती आले. यात तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकार स्थापन करेल, असे संकेत आहेत. सर्वेक्षणाची सरासरी पाहिली तर नितीश-भाजप व महाआघाडीतील विजयी जागांचे अंतर फारच कमी आहे. महाआघाडी १२६ जागी तर नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए १०९ जागांवर विजयी होईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे ८-१० जागांचा जरी फरक पडला तर दोघांपैकी कुणीही सरकार स्थापन करू शकते. यासाठी १० नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागेल. यंदा बिहारमध्ये बेरोजगारीचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा होता. याच मुद्द्यावर बहुतेक तेजस्वी यादव यांच्या पारड्यात मतदारांनी मते टाकल्याचे दिसते. मध्य प्रदेशात भाजप सरकारला दिलासा मिळणार असे दिसते. येथे २८ जागांवर पोटनिवडणूक झाली. यात १६ जागा भाजपला मिळतील, असे दिसते.

> २०१५च्या निवडणुकीत राजद, जदयू आणि काँग्रेस सोबत होते. नंतर जदयूने यूपीएशी फारकत घेत भाजपशी आघाडी केली होती.

> या निवडणुकीत सर्व प्रमुख एक्झिट पोलचे अंदाज चुकले होते. मात्र, २०१० मध्ये हेच एक्झिट पोल तंतोतंत जुळले होते, हे इथे उल्लेखनीय होय.

कोरोनाकाळात स्थलांतराचा नितीशकुमारांना फटका

८० टक्के मते विकास आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर पडली आहेत. हे दोन्ही मुद्दे नितीशकुमार यांच्याविरोधात गेेले,असा दावा इंडिया टुडे-एएमआयच्या सर्वेक्षणात करण्यात आला. तर कोराेनाकाळात बिहारमध्ये परतलेल्या लोकांनी महाआघाडीला पसंती दिली आहे, असा दावा इतर संस्थांनी केला आहे.

अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना :

मतदानादरम्यान राज्यात काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटनांचेही गालबोट लागले. पूर्णियात धमदाहा विधानसभा मतदारसंघात मत टाकण्यासाठी गेलेल्या तरुणाची गुन्हेगारांनी मतदान केंद्रापासून २०० मीटर अंतरावर असताना गोळी मारून हत्या केली.

कोरोनावर लोकशाही भारी, तीनटप्प्यांत सन २०१५ इतके मतदान

पाटणा | कोरोनाचे संकट असूनही बिहारमध्ये २४३ जागांवरील मतदान पूर्ण झाले. शनिवारी तिसऱ्या टप्प्यात ५७.९१ टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. अद्याप अंतिम आकडेवारी आलेली नाही. त्यात मतदानाचा टक्का वाढू शकतो, असे निवडणुक उपायुक्त चंद्रभूषण कुमार यांनी सांगितले. कोरोनाकाळात देशातील ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे मतदान कमी होईल अशी शंका होती परंतु ती फोल ठरली. सन २०१५ मध्ये एकूण ५७.१२ टक्के मतदान झाले होते. या वेळी ५६.५६ टक्के झाले.

बातम्या आणखी आहेत...