आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिहारच्या बगहात इयत्ता 6वीत शिकणाऱ्या एका 13 वर्षीय बालिकेची सामूहिक बलात्कारानंतर निर्घृण हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. आरोपींनी पुरावे मिटवण्यासाठी मृतदेह 7 फूट लांब व 4 फूट खोल खड्ड्यात पुरला. ही मुलगी गत 15 डिसेंबरपासून बेपत्ता होती.
रविवारी सकाळी कुटुंबीय व ग्रामस्थ मुलीचा शोध घेत नदीच्या पलिकडे पोहोचल्यानंतर त्यांना धक्का बसला. नदीलगत जमीन नुकतीच खोदण्यात आल्याचे दिसून आले. तसेच त्याच्यावर बोरीचे काटेही टाकण्यात आले होते.
ग्रामस्थांना संशय आल्यानंतर त्यांनी ती जागा खोदली असता त्यात मुलीचा मृतदेह आढळला. खड्ड्याजवळच मुलीचा शालेय गणवेशही पडला होता. ऊसाच्या शेतात तिची चप्पल आढळली.
त्यानंतर या भागात मोठा हल्लकल्लोळ माजला. आसपासच्या गावातील लोकांचा जमाव जमला. दुसरीकडे, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. पटखौली ओपी क्षेत्रातील एका गावात ही घटना घडली आहे. या मुलीची ऊसाच्या पात्याने गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ऊसाच्या शेतात प्रथम तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर नदीच्या शेजारी खड्डा खोदून तिचा मृतदेह पुरून टाकण्यात आला.
4 छायाचित्रांतून समजून घ्या संपूर्ण घटना...
मुलीचा मृतदेह आढळल्यानंतर ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. त्यांनी पोलिसांना मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार 15 तारखेलाच दाखल केल्याचा दावा केला आहे.
या प्रकरणी पीडित कुटुंबीयांनी गावातीलच एका तरुणावर संशय व्यक्त केला होता. पण पोलिसांनी वेळीच त्याचा शोध घेतला नाही. तसेच मुलीचा शोध घेण्याकडेही दुर्लक्ष केले. परिणामी, आज मुलीचा थेट मृतदेहच आढळला. मुलीच्या मृतदेहाजवळच तिचा स्कूल यूनिफॉर्मही आढळला. कुटुंबीयांनी मुलीचा जीव घेणाऱ्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.