आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bihar Gaya News । Cruelty Of Naxals In Bihar । Four Members Of The Same Family Were Hanged, And A Bomb Blast Ripped Through A House

धक्कादायक:बिहारमध्ये नक्षलवाद्यांची क्रूरता; एकाच कुटूंबातील चार जणांना दिली फाशी, बॉम्बच्या साहाय्याने घरातही केला स्फोट

गया15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिहारमध्ये नक्षलवाद्यांच्या क्रूरतेचे आणखी एक उदाहरण पाहायला मिळाले आहे. नक्षलवाद्यांनी एका घरावर हल्ला करत घरातील चार जणांना फाशी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फाशी दिल्यानंतर नक्षलवाद्यांनी बॉम्बच्या साहाय्याने त्यांच्या घराला देखील उडवून दिेले आहे.

ही घटना बिहारच्या गया जिल्ह्यात शनिवारी घडली असल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी धाव घेत तपासकार्य सुरू केले आहे. नक्षलवाद्यांनी दिलेल्या फाशीत एकाच कुटूंबातील चार जणांचा समावेश असून, त्यात सरजू सिंह त्यांचे दोन मुले आणि पत्नीला समावेश आहे.

या घटनेनंतर नक्षलवाद्यांनी घटनास्थळी एक पत्र ठेवले आहे. त्यात म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी चार नक्षलवाद्यांना षड्यंत्र रचून त्यांची हत्या एका पोलीस अधिकाऱ्याने केली होती. त्यांना विष पाजण्यात आले होते. असा उल्लेख नक्षलवाद्यांनी पत्रात केला आहे. विशेष म्हणजे त्या पत्रात पोलीसांनी मिळून हत्या केली असल्याचा आरोप त्यांनी लावला आहे. सोबतच त्या चार जोडीदारांचे नाव देखील त्या पत्रात लिहले आहे.

मागील वर्षी डुमरिया पोलीस स्टेशन हद्दीतील मोनबार या गावात एका पोलीसाने चार नक्षलवाद्यांचे इन्काऊंटर केले होते. त्या घटनेला नक्षलवाद्यांच्या काही नेत्यांनी ती घटना षड्यंत्र असल्याचे म्हटले होते. ज्या घरात नक्षलवादी थांबले होते.

त्या घरमालकाच्या साहाय्याने त्यांच्या जेवनात विष टाकण्यात आले. पोलीस आणि घरमालकाने त्या नक्षलवाद्यांची हत्या केली आहे. असा आरोप त्यांनी केला होता. त्याचा राग मनात धरत नक्षलवाद्यांनी शनिवारी एकाच कुटूंबातील चार जणांना फाशी दिली असून, घर देखील बॉम्बच्या साहाय्याने उद्धवस्त केले आहे.

बातम्या आणखी आहेत...