आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Bihar Government Formation News And Updates : NDA Meeting In Patna; Nitish Kumar Claims For New Government Formation Devendra Fadanvees, Bhupendra Yadav, Shushil Modi, Rajnath Singh Arriving

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिहारच्या नव्या सरकारचा निर्णय:उद्या नितीश कुमार सातव्यांदा मुख्यमंत्रीपदाची घेणार शपथ; उपमुख्यमंत्री बदलण्याची शक्यता, तारकिशोर प्रसाद यांचे नाव सर्वात पुढे

पाटणा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो 12 ​​नोव्हेंबरचा आहे. निवडणूक जिंकल्यानंतर नितीश पक्षाच्या कार्यालयात पोहचल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. - Divya Marathi
फोटो 12 ​​नोव्हेंबरचा आहे. निवडणूक जिंकल्यानंतर नितीश पक्षाच्या कार्यालयात पोहचल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.
  • नितीश, सुशील आणि चौधरी यांची नावे निश्चित, पण…

बिहारमध्ये नवीन मुख्यमंत्र्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. रविवारी झालेल्या NDA च्या बैठकीमध्ये नितीश कुमारांची विधीमंडळनेतेपदी निवड करण्यात आली. सोमवारी ते राजभवनात संध्याकाळी वाजता सातव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. NDA च्या बैठकीपूर्वी जदयूची बैठक झाली. यामध्ये नितीश कुमारांची विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली.

तारकिशोर उपनेता, उपमुख्यमंत्री पदाचे उमेदवार

भाजप नेते तारकिशोर प्रसाद यांना NDA चा उपनेता निवडण्यात आले आहे, तर रेणु देवी यांची भाजपच्या विधीमंडळनेते पदी निवड झाली आहे. सामान्यतः NDA चा उपनेता उपमुख्यमंत्री होतो, पण यावेळेस काही अडचण येण्याची शक्यता आहे. नितीश कुमार यांना सुशील मोदी यांना उपमुख्यमंत्री बनवायचे आहे, तर भाजप त्यांना राज्यसभेवर पाठवून केंद्रात मंत्री बनवण्याच्या विचारात आहे. यामुळेच, उपनेते तारकिशोर यांचे नाव उपमुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सर्वात पुढे आहे.

काय म्हणाले नितीश ?

राज्यपालांची भेट घेतल्यानंतर नितीश म्हणाले की, NDA च्या बैठकीत मला नेतेपदी निवडण्यात आले आहे. राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा सादर केला आहे. उद्या दुपारी शपथविधी होईल. एनडीएतील घटक पक्षांकडे लक्ष्य असेल.

दरम्यान NDA ची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पर्यवेक्षक म्हणून राजनाथ सिंह, भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस आणि बिहार भाजपा प्रभारी भूपेंद्र यादव उपस्थित होते. दरम्यान उपमुख्यमंत्र्यांविषयी पेच कायम आहे. तसेच नितीश कुमारांनी बैठकीनंतर राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेत सरकार बनवण्याचा दावा केला.

प्रत्येकाचे मत वेगळे

NDA च्या बैठकीमध्ये भाजप आमदार श्रेयसी सिंह आपल्या आई पुतुल देवींसोबत पोहोचल्या. पुतुल देवींनी मुलीच्या मंत्री बनवण्याच्या प्रश्नावर म्हटले की, हा पक्षाचा निर्णय असेल. श्रेयसी प्रतिभेची धनी आहे आणि माझ्यानुसार तिला संधी मिळायला हवी. भाजप नेता प्रेम कुमार यांनी म्हटले की, माझी उपमुख्यमंत्री बनण्याची कोणतीही इच्छा नाही, फक्त पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे

घटक पक्षांना भाजप केंद्राची ऑफर देऊ शकते

जेडीयू केंद्रातील एनडीए सरकारचा एक भाग आहे, परंतु त्यांच्याकडे मंत्रीपद नाहीत. ही बाब सभेत अडकल्यास भाजप घटक पक्षांना केंद्रात सहभागी करून घेण्याची ऑफर देण्याची शक्यता आहे. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर नितीश यांनी केंद्रातील मंत्रिपदाची ऑफर नाकारली होती. बिहारमध्ये भाजपाकडे 17 आणि जेडीयूचे 16 खासदार आहेत. त्यामुळे नितीश किमान तीन केंद्रीय मंत्रीपदाची मागणी करत होते. 6 खासदार असलेल्या लोजपाने विधानसभा निवडणुकीत दाखविलेल्या वृत्तीमुळे नितीश नाराज आहेत. यामुळे ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसमवेत एलजेपीसंदर्भात अटी घालू शकतात.

बातम्या आणखी आहेत...