आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bihar Government Recommends CBI Probe In Sushant Sigh Suicide Case ; Riya Chakraborty's Lawyer Said It Is Up To The Bihar Government To Do So

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण:बिहार सरकारकडून सीबीआय चौकशीची शिफारस; रिया चक्रवर्तीचे वकील म्हणाले - असे करणे बिहार सरकारच्या अधिकारात

पाटणा/मुंबई3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांत सिंहचे वडील के. के. सिंह यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी निर्णय घेतला

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात बिहार सरकारने सीबीआय चौकशीची शिफारस केली आहे. सुशांत सिंहचे वडील के. के. सिंह यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हा निर्णय घेतला. दरम्यान, सुशांत सिंहची मैत्रीण रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मानेशिंदे यांनी सवाल केला की, हे प्रकरण बिहार सरकारच्या सांगण्यावरून सीबीआयकडे देता येणार नाही. कारण बिहार पोलिसांचा याच्याशी काहीही संबंध नाही. हे प्रकरण बिहारच्या अधिकार क्षेत्रात येत नाही.

महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेसने सीबीआय चौकशीच्या शिफारशीला राज्याच्या अधिकारांवर अतिक्रमण म्हटले आहे. तर, नितीशकुमार केवळ राजकारण करत असल्याचा शिवसेनेचा आरोप आहे . दुसरीकडे मंुबई उच्च न्यायालयाने प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणी बुधवारपर्यंत स्थगित केली. तसेच, दिल्लीत सर्वोच्च न्यायालयातही सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या दोन याचिका दाखल करण्यात आल्या.

बिहारचे डीजीपी म्हणाले, भीतीमुळे आणखी चार अधिकारी मुंबईत कोठे तरी लपले : बिहार व मुंबई पोलिसांमध्ये वाद सुरूच आहे. बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडेय यांनी दावा केला की, चार वर्षांत सुशांतच्या बँक खात्यातून सुमारे ५० कोटी रुपये काढण्यात आले, मुंबई पोलिसांनी त्याची चौकशी का केली नाही? पांडे यांनी सांगितले, आमचे आयपीएस अधिकारी विनयकुमार तिवारी यांना जबरदस्तीने क्वॉरंटाइन करण्यात आले. मुंबईचे अधिकारी आमच्याशी बोलत नाहीत. यातून काहीतरी चुकीचे घडत असल्याचे दिसते. पांडेय यांनी सांगितले की, तिवारींना गुन्हेगारासारखी वागणूक दिली जात आहे. त्यांना घरातच बंद करण्यात आले आहे. आमचे चार अधिकारी मुंबई पोलिसांच्या भीतीने कोठे तरी लपले आहेत.