आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहार सरकारचा निर्णय:प्रवासी मजुरांना तिकीट भाड्यासोबतच 500 रुपये देणार, मुख्यमंत्री नितीश कुमार यांची घोषणा

पटना2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रेल्वे विभागाने तिकीटातील 85 टक्के रक्कम भरण्याची घोषणा केली आहे

बिहार सरकारने प्रवासी मजुरांसाटी एक कौतुकास्पद निर्णयाची घोषणा केली आहे. सरकार सर्व प्रवासी मजुरांना तिकीटासोबतच 500 रुपये देणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी याबाबत घोषणा केली.

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज त्यांचा पक्ष सर्व प्रवासी मजुरांच्या तिकीटाचा खर्च उचलण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यानंतर आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनीदेखील त्यांच्या पक्षामार्फत 50 ट्रेन्सचा किराया देण्याची घोषणा करण्यात आली. दरम्यान, रेल्वे विभागाकडून तिकीट भाडेसंबंधी केलेल्या विधानानंतर मतभेद सुरू झाले आहेत. रेल्वे विभागाचे म्हणने आहे की, रेल्वे फक्त तिकीटातील 85 टक्के किराया देण्यास तयार आहे, इथर 15 टक्के राज्य सरकारांना द्यावा लागेल. यावर विरोधकांचे म्हणने आहे की, सध्या राज्य सरकारवर भार टाकणे बरोबर नाही. तर, अनेक राज्य सरकारांनी यावर अद्याप स्पष्टीकरण दिले नाही. याचा अर्थ असा झाला की, प्रवासी मजुरांना आता स्व खर्चाने प्रवास करावा लागेल.

विरोधकांचे म्हणने आहे की, मागील अनेक दिवसांपासून मजुरांकडे काम नाही. अशा परिस्थितीत ते प्रवासाचे भाडे देऊ शकत नाही. दरम्यान, केंद्र सरकारच्या सूत्रांनी सांगितले की, रेल्वे विभागाने तिकीटातील 85 टक्के रक्कम देण्याची घोषणा केली आहे, फक्त 15 टक्के राज्य सरकारकडून घेण्यात येत आहेत. यातच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी म्हणाल्या की, मध्य प्रदेश सरकारने केल्याप्रमाणे इतर राज्य सरकारांनीदेखील 15 टक्के किराया भरावा.

बातम्या आणखी आहेत...