आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bihar Has More Alcoholics Than Maharashtra; 14 Percent Urban, 16 Percent; National Family Health Survey

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य पाहणी:बिहारमध्ये मद्यपान करणारे महाराष्ट्रापेक्षा जास्त; 14 टक्के शहरी, ग्रामीण भागातील 16 टक्के!

नवी दिल्ली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दारू पिण्यात कर्नाटकाचा पहिला क्रमांक, मिझोराममध्ये 77 % पुरुष, 62 टक्के महिला तंबाखूच्या शौकीन

बिहारमध्ये दारूबंदी असतानाही १५ टक्के लोक दररोज मद्यपान करतात. त्याशिवाय बिहारचे ४८ टक्के पुरुष व ५ टक्के महिला तंबाखूचे सेवन करतात. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य पाहणी २०१९-२० नुसार ही बाब समोर आली आहे. बिहारच्या शहरांत १४ टक्के गावांत १५.८ टक्के लोक दारू पितात. मद्यपानात कर्नाटकमधील पुरुष पहिल्या तर महाराष्ट्रातील पुरुष तिसऱ्या स्थानी आहेत. दारूबंदी असलेल्या गुजरात व जम्मू-काश्मीरमध्ये पुरुष खूप कमी दारू पितात. सिक्कीममधील महिलांच्या मद्यपानाचे प्रमाण १६.२ टक्के आहे. आसाममध्ये ७.३ टक्के महिला मद्यपान करतात. याबाबतीत तेलंगण तिसऱ्या क्रमांकावर आहे. या पाहणीनुसार मद्यपानाच्या तुलनेत सर्वच राज्यांत तंबाखू व धूम्रपानाचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले. तेलंगण व गोवा त्यास अपवाद ठरतात..तंबाखूचा सर्वात जास्त वापर मिझोराममध्ये होतो. येथे ७७.८ टक्के पुरुष व सुमारे ६२ टक्के महिला त्याचे सेवन करतात. तंबाखूचा सर्वात कमी वापर केरळमध्ये होतो. येथे १७ टक्के लोक तंबाखूचे सेवन करतात. गोव्यात १८ टक्के पुरुष तंबाखू खातात. हिमाचलमध्ये १.७ टक्के महिला तंबाखू खातात.

मिझोराम : ७७ % पुरुष, ६२ टक्के महिला तंबाखूच्या शौकीन

तंबाखूचा सर्वात जास्त वापर मिझोराममध्ये होतो. येथे ७७.८ टक्के पुरुष व सुमारे ६२ टक्के महिला त्याचे सेवन करतात. तंबाखूचा सर्वात कमी वापर केरळमध्ये होतो. येथे १७ टक्के लोक तंबाखूचे सेवन करतात. गोव्यात १८ टक्के पुरुष तंबाखू खातात. हिमाचलमध्ये १.७ टक्के महिला तंबाखू खातात.

६ हजारांहून जास्त जणांना कैद, बिहारमधील वास्तव चव्हाट्यावर

बिहारमध्ये साडेचार वर्षांपासून दारूबंदी कायदा लागू आहे. मद्यपान प्रकरणात ६ हजारांहून जास्त लोक तुरुंगात आहेत. महाराष्ट्रातील शहरी भागात १४.७ टक्के पुरुष मद्यपान करतात. बिहारमधील शहरी भागात १५.८ टक्के पुरुष मद्यपान करतात. महाराष्ट्रात मद्यपान करणाऱ्या १५ वर्षे वयोगटातील पुरुषांचे प्रमाण १३.९ टक्के आहे.

बातम्या आणखी आहेत...