आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Bihar Jawan Sunil Kumar Name Confusion After Jawans Martyred As India China Border Tension Galwan Valley Stand Off Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुखद धक्का:शहीद झाल्याचे वृत्त झळकल्याच्या दुसऱ्याच दिवशी जवान म्हणाला घाबरू नका मी जिवंत आहे! कुटुंबियांना सुखद धक्का

पाटणा10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • खुद्द जवान सुनील कुमारने पत्नीला फोन करून दिला जिवंत असल्याचा पुरावा

भारत-चीन सीमेवर झालेल्या हिंसाचारात शहीद झालेल्या जवानांमध्ये बिहारच्या सुनील कुमार यांचेही नाव असल्याची माहिती मंगळवारी समोर आली होती. आपला पती गेल्याच्या दुखात पत्नी आणि समस्त कुटुंबियांनी हंबरडा फोडला. अख्ख्या गावात शोककळा पसरली. परंतु, या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी सुनीलच्या कुटुंबियांना सुखद धक्का लागला. खुद्द सुनीलने बुधवारी आपल्या पत्नीला फोन केला. तसेच कुणीही घाबरू नये आपण जिवंत आहोत अशी माहिती दिली.

सुनीलचा एक कॉल येताच शोकाकुल झालेल्या कुटुंबियांचे आनंद गगनात मावेनासे झाले. आपल्या पत्नीसह सुनीलने आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांशी सुद्धा बातचीत केली. तत्पूर्वी मंगळवारी संध्याकाळी वृत्त आले होते की भारत आणि चीन सीमेवर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसाचार झाला आणि त्यामध्ये शहीद झालेल्यांच्या यादीत सुनीलचे देखील नाव आहे.

सुनीलची पत्नी मेनकाने सांगितल्याप्रमाणे, 'माझा पती सुरक्षित आहे. तो शहीद झाल्याची खोटी बातमी आली होती. सुनील कुमार नावाच्या दुसरा एक जवान शहीद झाला. त्याच नावावरून हा संपूर्ण गोंधळ उडाला होता. माझ्या पतीने फोनवरून मला सविस्तर माहिती दिली आहे. त्यांना काहीच झालेले नाही. जणू मला एक जीवनदान मिळाले आहे.’

तत्पूर्वी मंगळवारी आपला पती शहीद झाल्याचे वृत्त ऐकल्यानंतर पत्नी मेनकाचे असे हाल झाले होते.
तत्पूर्वी मंगळवारी आपला पती शहीद झाल्याचे वृत्त ऐकल्यानंतर पत्नी मेनकाचे असे हाल झाले होते.
बातम्या आणखी आहेत...