आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिहारमध्ये सध्या एका अनोख्या लग्नाची चर्चा रंगली आहे. प्रकरण छपराचे आहे. येथे शुक्रवारी रात्री उशिरा एक 25 वर्षीय प्रियकर आपल्या 22 वर्षीय प्रेयसीला भेटण्यासाठी पोहोचला होता. तेव्हा अचानक मुलीच्या कुटुंबाने त्यांना पाहिले. त्यानंतर कुटुंब व गावकऱ्यांना पाहून प्रियकराने थेट विहिरीत उडी मारली.
गावकऱ्यांनी प्रथम विहिरीत उडी मारलेल्या तरुणाला दोरीने बाहेर काढले. त्यानंतर धुमधडाक्यात त्या दोघांचे लग्न लावून दिले. मुलाने यावेळी त्यांच्यावर बळजबरी केल्याचा आरोप केला. तसेच आपल्याला हे लग्न मान्य नसल्याचेही सांगितले. पण तरुणीने त्याच्याशीच लग्न करण्याचा आग्रह धरला.
प्रथम 4 छायाचित्रांत पाहा संपूर्ण कहाणी...
शुक्रवारी रात्री तरुण आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी आला होता. रात्री मुलीच्या कुटुंबाने दोघांना भेटताना पाहिले. त्यानंतर कुटुंबाने आरडाओरडा केल्याने गावकरी जमले. ग्रामस्थांना पाहून तरुण घाबरला. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण वाचण्याचा कोणताही मार्ग न दिसल्याने त्याने थेट विहिरीत उडी मारली. त्यानंतर गावकऱ्यांनी दोरीच्या माध्यमातून त्याला बाहेर काढले व लग्न लावून दिले. या घटनेचा एक व्हिडिओही उजेडात आला आहे. प्रकरण गडखा ठाणे हद्दीतील मोतीराजपूर गावचे आहे. आता या लग्नाची अवघ्या पंचक्रोशीत खमंग चर्चा रंगली आहे.
4 वर्षांपासून अफेयर, पंचायतीने सुनावला फैसला
तेलपाच्या मुन्ना कुमार व गडखा ठाणे हद्दीतील मोतीराजपूरच्या सोनी कुमार यांचे मागील 4 वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होते. मुन्ना आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी आला होता. पण मुलीच्या कुटुंबीयांची त्याच्यावर नजर पडली. कुटुंबाने वाचण्यासाठी जवळच्या विहिरीत उडी मारली. तरुणीच्या कुटुंब व स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रयत्नाने मुन्ना राजला बाहेर काढले. यामुळे तो बचावला. त्यानंतर पंचायत बसली. त्यांनी दोघांशीही चर्चा केली. त्यानंतर गावातील मंदिरात त्यांचे लग्न लावून देण्यात आले.
तरुणासोबत गेली तरूणी
लग्नानंतर गावकऱ्यांनी तरुणाची समजूत घातली. त्यानंतर तो तयार झाला. त्याने तरुणीला आपल्या घरी नेले. मुलीने सांगितले की, गावकऱ्यांनी व मुलीच्या कुटुंबीयांच्या रागामुळे तो लग्नास नकार दिला. पण आता त्याची या लग्नाला कोणतीही हरकत नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.